Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat case: दुनिया झुकती है…’; अशोक खरातचा कोठडीत ‘मेंटल गेम’!

स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खरात सध्या कोठडीत विचित्र विधाने आणि वर्तन करत आहे. महिलांसोबत केलेली कृत्ये हा केवळ एका आध्यात्मिक विधीचा भाग होता," असा दावा त्याने केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 07, 2026 | 10:30 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ
  • लोक स्वतःहून माझ्याकडे येतात, मी कोणाला जबरदस्ती करत नाही- अशोक खरात
  • स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खरात सध्या कोठडीत विचित्र विधाने आणि वर्तन
Ashok Kharat case: अध्यात्मिक गुरुच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या खरातची कसून चौकशी सुरू असतानाच, त्याने अत्यंत निर्लज्जपणे आपल्या कृत्यांचे समर्थन केले आहे. *”दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए,”* असे अहंकार माजवणारे उद्गार त्याने काढल्याने पोलीसही थक्क झाले आहेत.

गुन्ह्यांची मालिका, पण माज कायम

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातवर आतापर्यंत १० हून अधिक फसवणुकीचे आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस कोठडीत असताना गुन्हेगारांमध्ये सहसा पश्चात्तापाची भावना असते, मात्र खरातच्या बाबतीत उलट पाहायला मिळत आहे. चौकशीदरम्यान तो कोणत्याही प्रकारे नरमाई न दाखवता उलट उद्धटपणे उत्तरे देत आहे.

Nanded Crime: नांदेड हादरलं! मुलाने पेटत्या दुचाकीवर वडिलांना ढकलले; उपचारादरम्यान मृत्यू

चौकशीतील धक्कादायक खुलासे

“लोक स्वतःहून माझ्याकडे येतात, मी कोणाला जबरदस्ती करत नाही,” असा दावा करत त्याने आपल्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातने ‘दुनिया झुकती है…’ असे विधान करून आपण केलेल्या गुन्ह्यांचा जणू त्याला कोणताही पश्चाताप नसल्याचे दाखवून दिले आहे. महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक शोषण करणे आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे, असा त्याचा क्रूर पायंडा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नाशिक पोलिसांचा कसून तपास

अशोक खरातच्या या उद्दामपणामुळे तपास यंत्रणांनी आता अधिक कठोर पावले उचलली आहेत. त्याच्या मोबाईलमधील डेटा, बँक खात्यांचे व्यवहार (ज्यात १०० कोटींच्या व्यवहाराचा संशय आहे) आणि पीडित महिलांचे जबाब या आधारे पोलीस भक्कम पुरावे गोळा करत आहेत. भोंदूगिरीच्या या जाळ्यात आणखी कोण पांढरपेशी लोक सामील आहेत, याचाही शोध आता ‘एसआयटी’ (SIT) घेत आहे.

खरातने चौकशीत सांगितले की, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो जाणीवपूर्वक त्यांच्या मनात भविष्याबद्दल किंवा संकटांबद्दल भीती निर्माण करायचा. एकदा का भीती बसली की, महिला त्याच्या सांगण्यानुसार वागत असत. धक्कादायक म्हणजे, महिलांवर केलेले अत्याचार आणि आर्थिक फसवणूक याला त्याने ‘एका विधीचा भाग’ असे संबोधून आपल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला आहे.

Thane Crime: विश्वासघाताची परिसीमा! खासगी बोलायचं आहे म्हणत हॉटेलमध्ये नेले; गुंगीचं औषध देत दोन वेळा अत्याचार

कोठडीत मंत्रजपाचे ढोंग आणि विचित्र बडबड

स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खरात सध्या कोठडीत विचित्र विधाने आणि वर्तन करत आहे. महिलांसोबत केलेली कृत्ये हा केवळ एका आध्यात्मिक विधीचा भाग होता,” असा दावा त्याने केला आहे. माझ्या अंतर्मनानेच मला आज धोका दिला, ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले,” असे विधान करून तो स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कोठडीत असताना तो सतत मंत्रजप करण्याचे ढोंग करतो आणि “आता मी कोणाचेही ऐकणार नाही, फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार,” अशी पुटपुट करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

अशोक खरातच्या या विचित्र वागण्यामुळे आणि ‘मेंटल गेम’मुळे पोलीस दिशाभूल होऊ दिलेली नाही. नाशिक पोलीस आणि एसआयटीने (SIT) त्याच्याविरुद्धचे पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. विज्ञानाच्या नावाखाली केलेल्या हातचलाखीचे आणि ट्रिक्सचे पुरावे गोळा केले जात आहेत. महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलेले व्हिडिओ आणि चॅट्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच, १०० कोटींच्या संशयास्पद व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.

 

Web Title: Hypocrisy in custody ashok kharat claims assault as spiritual ritual police intensify investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik Crime
  • Nashik Police

संबंधित बातम्या

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ
1

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद
2

Nashik Crime: दुचाकीला कट लागला अन् कारचालकाने पोटात खुपसला चाकू; CCTV मध्ये थरार कैद

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश
3

Nashik News: FDAचा मोठा दणका! नाशिकमधील 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित, 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा
4

अशोक खरातवरील सिनेमावरून रुपाली चाकणकर भडकल्या, चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.