Beed Crime: बीड हादरलं! 17 वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीत संशयास्पद आढळला मृतदेह
काय घडलं नेमकं?
पीडित नर्स आणि आरोपी वार्डबॉय दोघेही ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात नोकरीला आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले परिचित होते. त्यामुळे तिचा विश्वास संपादन करून त्याने खासगी बोलायचे असल्याचे सांगत एका हॉटेलवर नेले होते. आरोपीने तिला आधी ठाण्यातील हॉटेल मौर्या येथे नेले. हॉटेलमधील एका रूममध्ये गेल्यानंतर गुंगी येणारा पदार्थ मिसळलेले ज्यूस त्याने तिला दिले. त्यांनतर नर्स बेशुद्ध झाली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर बदनामी करण्याची धमकी देत त्याने तिला सिग्नेचर हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथेही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित वॉर्डबॉयविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.
पंजाबच्या रिक्षाचालकावर भाळली ‘बिझनेसमन’ पत्नी; 3.30 लाखांचा ऐवज घेऊन फरार; गुन्हा दाखल
पर्यटनासाठी पंजाबला गेलेले ठाण्यातील एका व्यावसायिकाचे कुटुंब एका अनपेक्षित वळणामुळे विखुरले गेले आहे. अमृतसरमधील एका रिक्षाचालकाच्या प्रेमात पडलेल्या पत्नीने, आपल्या मुलासह आणि आईंसह घर सोडून थेट पंजाब गाठले. जाताना घरातील सुमारे ३.३० लाख रुपयांचा मुद्देमालही लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli Crime: सांगली हादरली! २४ तासांत तिहेरी हत्याकांड; दिवसाढवळ्या रक्तस्नानाने भीतीचे सावट






