Impersonator Air Force jawan Gaurav Kumar arrested Pune Crime News
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ झाली असून यंत्रणा अलर्टवर आली आहे. पुण्यामध्ये हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी रविवारी दिली.
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार (वडिलांचे नाव – दिनेश कुमार) याच्या संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला अडवण्यात आले. सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने १८ मे रोजी रात्री ८:४० वाजता पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शोध मोहिमेदरम्यान, आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.
पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम १६८ अंतर्गत खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत. अधिक तपशील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहरातील दिवसा आणि रात्रीच्या सुमारास एकट्या पादचारी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन आरोपींना बेड्या ठोकत त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांनी खडक तसेच लष्कर परिसरात नागरिकांना लुटल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. आयान फिरदोस पठाण (वय १८, रा. भवानी पेठ) व अनिकेत दामु आरणे (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस अंमलदार रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.
गेल्या आठवड्यात लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एका नागरिकाला तिघांनी लुटले होते. त्यांना चालत्या गाडीवरून ढकलून देऊन मोबाईल पळविला होता. याप्रकरणी लष्कर पोलिसांत गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा आयान पठाण व अनिकेत आरणे यांनी केला आहे. त्यानूसार, पथकाने या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची माहिती दिली.