Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Hit And Run : पुन्हा हिट अँड रन, मद्यधुंद कार चालकाची चार वाहनांना, नऊ गंभीर जखमी

Ulhasnagar Hit And Run News : उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून, मद्यधुंद चालकाने कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 24, 2024 | 11:49 AM
पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कार चालकाची चार वाहनांना, नऊ गंभीर जखमी (फोटो सौजन्य-X)

पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कार चालकाची चार वाहनांना, नऊ गंभीर जखमी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ulhasnagar Hit And Run News In Marathi: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून, मद्यधुंद चालकाने कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. कारच्या धडक दिलेल्या वाहनांची चक्काचूर झाला आहे.

अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. दारूच्या नशेत वाहन चालवून तळीराम स्वतःसहीत इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. पुणे, मुंबईत अपघाताच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना भीषण अपघात घडल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी सर्व अपघातग्रस्त गंभीर जखमी आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची? विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर मोठी खलबतं सुरु

दारूच्या नशेत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या चालकाने रिक्षा आणि मोटारसायकला जोरदार धडक दिली.यात पाच जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.तर कारमधील दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे.हा सर्व प्रकार उल्हासनगरच्या व्हिनस चौकात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजता श्रीराम चौकाकडून व्हीनस चौकाच्या दिशेने एमएच 04 एचएफ 7030 ही गाडी वेगाने येत होती. त्याचवेळी प्रसूती रुग्णालयासमोर भाजी आणण्यासाठी जात असलेल्या एमएच 05 सीजी 9918 क्रमांकाच्या रिक्षाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षा पलटी झाली.

जखमींना रुग्णालयात दाखल न करता पळ काढत कार चालकाने भरधाव वेगाने पुढे जंगल हॉटेल जवळील महादेव मंदिरासमोर एक्टिवावर जाणारे दीपक पाटकर यांना उडवले. तर 80 पेक्षा जास्त वेगाने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विनस चौकात चौथर्‍याला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या बोनेटचा चेंदामेंदा झाला आहे.

अपघातानंतर सतर्क नागरिकांनी कारचालक आणि त्याचा मित्र या दोघांना शिताफीने बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दीपक पाटकर आणि रिक्षा चालक दशरथ मोरे यांना उपचारासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच भाजी विक्रेता गुप्ता याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारचालक आणि त्याचा सहकारी हे दोघेही दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पुण्यात डंपरचालकाने 9 जणांना चिरडले

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यच्या वाघोली परिसरात भरधाव वेगात आलेल्या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना धडक दिली. यामध्ये दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या वेळी डंपरचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गजानन शंकर तोट्रे (वय 26) असे त्या चालकाचे नाव आहे. या अपघातामुळे पुण्याच एकच खळबळ माजली. त्यातच आता उल्हासनगरमध्येही हिट अँड रनच असेच प्रकरण घडल्यामुळे गदारोळ माजला आहे.

“…तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही निर्दयी आहात”; खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र 

Web Title: In a hit and run incident in ulhasnagar and drunk driver drove a car and hit three to four vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • Mumbai
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
1

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत
2

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरू! केवळ विक्री केंद्र नव्हे तर सामुदायिक अनुभव केंद्र
3

लुसिरा ज्वेलरीचे मुंबईत पहिले स्टोअर सुरू! केवळ विक्री केंद्र नव्हे तर सामुदायिक अनुभव केंद्र

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
4

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.