Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Burial Dispute: मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Kalyan Burial Dispute: कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वसीमुन्नीसा काझी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाच्या दफनविधीसाठी नातेवाईकांची फरफट सुरू आहे. शहाड येथील कब्रस्तान आणि कल्याणमधील टेकडी कब्रस्तान येथे दफनविधीस नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 10, 2026 | 01:49 PM
मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

मृतदेह घरात, पण दफनसाठी जागाच नाही! कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Follow Us
Follow Us:
  • एका कब्रस्तानातून दुसऱ्या कब्रस्तानात नातेवाईकांची फरफट
  • ६० वर्षीय महिलेच्या दफनविधीचा प्रश्न कायम
  • मृत्यूनंतरही वसीमुन्नीसा काझी यांच्या पार्थिवाची परवड
  • शहाड आणि टेकडी कब्रस्तानात दफनास नकार दिल्याचा आरोप
Kalyan Burial Dispute: मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अंत्यसंस्कार मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आणि माणुसकीचा प्रश्न आहे. मात्र, कल्याणमध्ये एका ६० वर्षीय महिलेच्या निधनानंतर तिच्या पार्थिवाच्या दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणाऱ्या वसीमुन्नीसा काझी यांचे निधन झाले. मात्र, निधनानंतरही दफनविधीची जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची मोठी फरफट सुरू आहे. (Kalyan Burial Dispute)

शहाड कब्रस्तानात दफनविधीस नकार दिल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, वसीमुन्नीसा काझी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दफनविधीसाठी शहाड येथील कब्रस्तान गाठले. मात्र, तेथे दफनविधी करण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे नातेवाईकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

टेकडी कब्रस्तानातही निराशा

शहाड येथे दफनविधी होऊ न शकल्याने नातेवाईकांनी कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथेही बाहेरची बॉडी दफन करत नाही, असे सांगून दफनविधीस नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एका कब्रस्तानातून दुसऱ्या कब्रस्तानात धावपळ करूनही कुटुंबीयांना दफनविधीसाठी जागा मिळू शकली नसल्याचे समोर आले आहे.

घरात पार्थिव, नातेवाईक हतबल

एकीकडे घरात मृतदेह ठेवलेला असताना दुसरीकडे दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने कुटुंबीय हतबल झाले आहेत. मृत्यूनंतरही अंत्यविधीसाठी अशी फरफट सहन करावी लागत असल्याने नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे शहरातील कब्रस्तानांमधील उपलब्ध जागा आणि बाहेरील व्यक्तींच्या दफनविधीबाबतचे नियम यांचा प्रश्नही चर्चेत आला आहे.

प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

या गंभीर प्रकरणात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. मृत महिलेच्या पार्थिवाचा सन्मानपूर्वक दफनविधी होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक मदत करावी, अशी अपेक्षा कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नातेवाईक फजलउद्दीन काझी यांनी आपली बाजू मांडली आहे. आता महापालिका प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेते आणि कुटुंबीयांना दफनविधीसाठी मदत मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Best Bus Accident News: “अनियंत्रित बसने सिग्नलवर आणला प्रलय!” मुंबईतील लोढा जंक्शनवर बेस्ट बसचा भीषण अपघात, अनेक वाहने उद्ध्वस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: कल्याणमध्ये दफनविधीचा प्रश्न कोणत्या महिलेच्या बाबतीत निर्माण झाला आहे?

    Ans: कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वसीमुन्नीसा काझी यांचे निधन झाल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Que: नातेवाईकांनी कोणत्या कब्रस्तानांमध्ये दफनविधीसाठी प्रयत्न केले?

    Ans: नातेवाईकांनी प्रथम शहाड येथील कब्रस्तानात आणि त्यानंतर कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानात दफनविधीसाठी प्रयत्न केले.

  • Que: नातेवाईकांनी काय मागणी केली आहे?

    Ans: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्यास मदत करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Kalyan woman dead body burial denied shahad tekdi cemetery mohane sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • maharashtra

संबंधित बातम्या

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?
1

नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!
2

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेसाठी नवी SOP लागू; नागरिक, पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध!

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी
4

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.