
crime (फोटो सौजन्य: social media)
अहमदाबाद: देशात आपण अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्या घटनेत महिलांनी प्रेमासाठी नवऱ्याचा काटा काढला. सोनम रघुवंशी प्रकरण असो किवा मुस्कान रस्तोगी यांनी ज्या पद्धतीने नवऱ्याला संपवल ते वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत रूबीने मित्राच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा खून केला आणि प्रेमासाठी नवऱ्याचा जीव घेतला. अहमदाबाद पोलिसांनी एक वर्षाने या हत्या कांडचा खुलासा केला आहे. रूबीने आपल्या नवऱ्याचा खून एक वर्ष रहस्यमय पद्धतीने सगळ लपवून ठेवलं.
धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
समीर अन्सारी एक वर्ष बेपत्ता!
समीर अन्सारी या व्यक्तीसोबत रूबीचा विवाह झाला होता. मात्र घरात सारखी या दोघांमध्ये भांडण होत होती. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या नवऱ्याची हत्या केली. सोबतीला प्रियकराला घेतलं आणि तिने काटा काढला. जेव्हा तक्रार क्राइम ब्रांचकडे आली तेव्हा त्यांना संशय आला होता. रुबीचे अनैतिक संबंध होते. त्यामधूनच तिने आपल्या नवऱ्याचा जीव घेतला. तिने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. खून केल्यानंतर तिचा बनाव हा एक वर्ष ही टिकू शकला नाही. त्याचा १४ महिने फ़ोन लागत नव्हता त्या नंतर तिने मृतदेह लपवून ठेवल्याच समोर आल आहे.
मृतदेह किचनखाली गाडला
रूबीने एवढ्या क्रूर पद्धतीने नवऱ्याची हत्या केली. आधी समीरला बांधून ठेवलं आणि त्या नंतर चाकूने भोसकलं. त्यात तो जमिनीवर पडला. मृतदेह कसा लपवायचा म्हणून तिने जमिनीखाली किचन रूम मध्येच मृतदेह हा टाईल खाली लपवून ठेवला . जेव्हा पोलीस घरात तपास करायला गेले तेव्हा त्यांना याचा सुगावा लागला . या गुन्ह्याची तिने कबुली दिली आहे . एक वर्षानंतर रूबीने केलेल्या खुनाच प्रकरण बाहेर आल आहे .