सिगारेट न दिल्याचा राग अनावर; हातगाडीवर काम करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, रवी शर्मा हा मूळचा बिहारच्या मुजफ्फरपुरच्या भटोलिया येथील रहिवासी असून तो दिल्लीतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तो सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करायचा. जवळपास एका वर्षापूर्वी त्याची काजल नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. संबंधित महिला ही मुजफ्फरपुरच्या सरदारपुर गावातील रहिवासी होती.
का केली हत्या?
काजलच्या वैवाहिक आयुष्यात खूप समस्या होत्या. तिचे तिच्या पतीसोबत सतत वाद व्हायचे आणि यामुळे एके दिवशी पतीसोबत भांडून ती दिल्लीला गेली. त्यांनतर, ती बऱ्याचदा रवीला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये जायची. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाली आणि काजलच्या त्याच्याकडे लग्नासाठी हट्ट करण्यास सुरुवात केली. पण, या कारणामुळे त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. दोन महिन्यांपूर्वी रवी त्याच्या मित्रांच्या मदतीने सुरतमध्ये येऊन तेथे कोसांबा येथे नोकरी करू लागला. दरम्यान, त्याने काजलच्या फोन नंबर सुद्धा ब्लॉक केला. तरीही, काजलने रवीच्या मित्रांना संपर्क साधला आणि रवीबद्दल माहिती न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच भीतीमुळे रवीच्या मित्रांनी काजलला रवीच्या घराचा पत्ता सांगितला.
कशी केली हत्या?
काजल आपल्या मुलासोबत कोसांबा येथे पोहोचली आणि ती रावीसोबत राहू लागली. परंतु, लग्नाच्या कारणावरून त्या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. आणि एकेदिवशी हा वाद वाढला आणि संतापाच्या भरात काजलचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिला ट्रॉली बॅगमध्ये टाकून फेकून दिला.पोलिसांनी आरोपीला
फरीदाबादमध्ये अटक केली आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी पीडितेच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झाला. सूरत ग्रामीण लोकल क्राइम ब्रांच ने आरोपीला अटक केली असून मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, रवीने आपला गुन्हा कबूल करत रविवारी काजलसोबत झालेल्या वादात तिची गळा दाबून हत्या केल्याचं आरोपीने सांगितलं.
मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…






