Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

ज्या वडिलांकडून सुरक्षिततेची अपेक्षा असते, त्याच्याकडूनच दहा वर्षीय मुलीचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नराधम बापाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 27, 2026 | 01:13 PM
चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

Follow Us
Follow Us:
  • मुलीला दिले सिगारेटचे चटके
  • बापाविरोधात गुन्हा दाखल
  • मिसारवाडीत संतापजनक प्रकार
छत्रपती संभाजीनगर : ज्या वडिलांकडून सुरक्षिततेची अपेक्षा असते, त्याच्याकडूनच दहा वर्षीय मुलीचा छळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिसारवाडी परिसरात राहणाऱ्या मुलीच्या अंगावर थंड पाणी टाकून तिच्या हातापायांना सिगारेटचे चटके दिल्याची तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सोपान नरळे यांनी दिली. या प्रकरणात १० वर्षीय पीडित मुलीच्या २४ वर्षीय भावाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे पत्नीसोबत राहुन पेंटर काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. तर त्याचे लहान भाऊ व १० वर्षीय पीडित बहिण नराधम बापासोबत राहतात. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१६ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी फोन करून पीडित मुलगी आणि वडील घरी दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वडिलांच्या घरी जाऊन पाहिले; मात्र दोघेही तेथे आढळले नाहीत. त्यामुळे त्याने दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान, जहागीर कॉलनी, जटवाडा रोड परिसरात राहणाऱ्या मावस बहिणीचा फोन आला. तिने पीडित मुलगी त्या परिसरात आल्याचे सांगितले. फिर्यादी तेथे पोहोचला असता पीडिता त्याला दिसली. भावाला पाहताच ती रडू लागली.

हे सुद्धा वाचा : शेतीच्या कामासाठी नदीवर गेले, पण परतलेच नाहीत! वीजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

मुलीच्या डोक्यावरील केसही कापले

भावाने विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरी वडिलांनी अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले, अंगावर थंड पाणी टाकले आणि हातापायांना सिगारेटचे चटके दिले, असे पीडितेने भावाला सांगितल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापून विनयभंग केल्याचाही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. मुलीने सांगितलेल्या प्रकारानंतर फिर्यादीने सिडको पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीनंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोपान नरळे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून मानव जातीला काळीमा पासणाऱ्या घटनेचा निषेध होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील मिसारवाडी परिसरात.

  • Que: मुलीच्या वडिलांवर काय आरोप आहेत?

    Ans: मुलीला सिगारेटचे चटके देणे, थंड पाणी टाकणे आणि केस कापल्याचे आरोप आहेत.

  • Que: आरोपी वडिलांवर काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: In chhatrapati sambhajinagar a ten year old girl has been molested by her father nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले
1

Sambhajinagar News: जरांगेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट होणार; शिवेंद्रराजे भोसले

Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्तरंजीत थरार! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ
2

Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्तरंजीत थरार! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर
4

पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.