Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर

एका वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरंदर तालुक्याच्या पानवडी गावात हा प्रकार घडला असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2026 | 05:11 PM
पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर

पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात वृद्ध दाम्पत्याची हत्या
  • घरासमोरून गायी-बैल नेण्यावरून झालेल्या वादातून हत्या 
  •  सासवड पोलिसांकडून तपास सुरू
सासवड : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता घरासमोरून जनावरे नेण्याच्या कारणावरून काही दिवसापूर्वी भावकीतील शेजाऱ्यांशी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून एका वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. पुरंदर तालुक्याच्या पानवडी गावात हा प्रकार घडला असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी गणेश सुभाष धिवार, (वय २७, रा. पानवडी) याच्या विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी अमर खरात ( वय ३४) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानवडी गावात आरोपी गणेश धिवार हा मयत मोहन धिवार यांच्या घराशेजारीच राहत असून त्यांच्यात काही दिवसापासून किरकोळ कारणावरून वाद होते. त्यातच फिर्यादीच्या दारासमोरून गायी व बैल नेत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरूनच आरोपीने रत्नमाला धिवार आणि मोहन धिवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली.

२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळची घटना

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२० च्या दरम्यान मयत वृद्ध दाम्पत्य आपल्या घराकडे निघालेले असताना घराच्या अंगणात आधीच तयारीत असलेल्या आरोपीने वृद्धांवर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला चढविला. यामध्ये दोघानाही जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. आणि त्यातच रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा : शेतीच्या कामासाठी नदीवर गेले, पण परतलेच नाहीत! वीजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

खून केल्यानंतर आरोपी फरार

मयत धिवार पती- पत्नी आणि आरोपी गणेश धिवार हे एकाच भावकीतील असून आरोपीचे कुटुंब गेल्या दोन ते तीन पिढ्यापासून रोजगारानिमित्त बाहेरगावी राहायला आहेत. त्यामध्ये आरोपी गणेश धिवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसापूर्वीच जेलमधून सुटून आला असून त्याला पुन्हा तडीपार केल्याने मूळ गावी राहायला आला होता. मात्र त्याच्या प्रवृत्तीने निष्पाप वृद्ध दाम्पत्याचा जीव घेतला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुरंदर तालुक्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या कुठे झाली?

    Ans: पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

  • Que: हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे काय आहेत?

    Ans: रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३) अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: वृद्ध दाम्पत्याच्या हत्येमागील कारण काय आहे?

    Ans: घरासमोरून गायी-बैल नेण्याच्या कारणावरून आरोपी आणि दाम्पत्यामध्ये वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: An elderly couple has been murdered in purandar taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Police

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले
1

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?
2

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू
3

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…
4

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.