Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंचवडमध्ये रिक्षा चालकाला पाईपने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

रिक्षा नंबरला लावण्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चिंचवडमधील गुरुद्वारा चौक येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 21, 2025 | 01:28 PM
चिंचवडमध्ये रिक्षा चालकाला पाईपने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

चिंचवडमध्ये रिक्षा चालकाला पाईपने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता रिक्षा नंबरला लावण्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चिंचवडमधील गुरुद्वारा चौक येथे घडली आहे. या प्रकरणी तानाजी दगडू पांचाळ (३५, रा. रमाबाईनगर, रावेत) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल राठोड (वय ३०), विठोबा लालचंद राठोड (वय ६५, दोघेही रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

तानाजी हे रिक्षा चालक असून ते त्यांची रिक्षा घेऊन गुरुद्वारा चौकात रिक्षा स्टॉपवर पॅसेंजर घेण्यासाठी थांबले. रिक्षा नंबरला लावण्यावरून त्यांचा विठोबा राठोड याच्याशी वाद झाला. विठोबा याने त्याच्या मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तानाजी यांना पाईपने बेदम मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी राहुल राठोड याला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील निगडीत तरुणावर चाकूने हल्ला; सपासप वार केले अन्…

निगडीत तरुणावर चाकूने हल्ला

गेल्या काही दिवसाखाली जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केलाय. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निगडी येथील चिकन चौक येथे घडली आहे. भरत भागवत म्हस्के (३४, राहुलनगर, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सूरज कोंडिराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल ऊर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रणदिवे, ओव्हाळ व वैरागे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

Web Title: In chinchwad a rickshaw driver was brutally beaten by two people nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • rickshaw driver

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.