Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाला प्लास्टिक बकेट, नंबर प्लेट व दगडाने  मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. येवलेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 12:30 AM
येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाला प्लास्टिक बकेट, नंबर प्लेट व दगडाने  मारहाण करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. येवलेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी प्रतीक दळवी, आर्यन एलवंडे, वेदांत जगताप (तिघे रा. चांबळी, ता. पुरंदर), सनी गावडे (रा. रावडेवाडी, ता. पुरंदर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कार्तिक लालासाहेब भिसे (वय २०, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गारवा हॉटेलसमोर, बोपदेव घाटाजवळ, येवलेवाडी येथे घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार थांबलेले असताना जुन्या वादातून आरोपींनी त्यांना घेरले. आर्यनने प्लास्टिक बकेटने, वेदांतने नंबर प्लेट व दगडाने, तर इतरांनी हाताने मारहाण केली. तसेच प्रतीक दळवी याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून पोलिसांत तक्रार केल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं!; बारामतीत जय पवारांचा घणाघात

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार

अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील न्यू आर्ट्स कॉलेजच्या पाठीमागे गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची भरदिवसा चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.७) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली आहे. रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. बोल्हेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रवींद्र चव्हाण हे सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात असताना त्यांच्यावर किरकोळ वादातून हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींसोबत त्यांचा गाडीचा कट लागण्यावरून वाद झाला, असे सांगितले जाते. रागाच्या भरात या दोन अज्ञात व्यक्तींनी चव्हाण यांची चाकूने भोकसून हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: An incident involving an attack on a young man has occurred in punes yeolewadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
1

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई
2

सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
3

तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले
4

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.