Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांचे ‘COP-24’ कात टाकणार! 700 कर्मचारी शहरभर पेट्रोलिंग करणार

कॉप-२४ च्या माध्यमातून २४ पोलीस शहरात पेट्रोलिंग करणार असून, घडलेल्या घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन कर्तव्य बजावणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 28, 2025 | 11:56 AM
पुणे पोलिसांचे 'COP-24' कात टाकणार! 700 कर्मचारी शहरभर पेट्रोलिंग करणार

पुणे पोलिसांचे 'COP-24' कात टाकणार! 700 कर्मचारी शहरभर पेट्रोलिंग करणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : व्हिजीबल पोलिसींगच्या धर्तीवर तसेच पुणेकरांच्या तात्काळ मदतीसाठी आणि सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉप-२४ च्या माध्यमातून २४ पोलीस शहरात पेट्रोलिंग करणार असून, घडलेल्या घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन कर्तव्य बजावणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. विशेष म्हणजे, या कॉप्संना वेगळा ड्रेस कोड असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या कॉप्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

पुणे पोलिसांकडून बीट मार्शल ही संकल्पना राबविली जाते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या-त्या पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी दोन सत्रात हद्दीत पेट्रोलिंग करतात. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यासह एखादा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण सोबतच त्यांना अडचणीच्या काळात मदतीसाठी ही बीट मार्शल ही संकल्पना राबविली जात होती. परंतु, मनुष्यबळ तसेच कामाचा ताण यामुळे इफेक्टिव्ह पेट्रोलिंग होत नाही. त्यात काही ‘वाढिव’ पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे लक्ष भलतीकडेच असते. त्यामुळे मूळ उद्देशच पुर्णत्वास जात नसल्याचे दिसते.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यापुढे पाऊल टाकत, या बीट मार्शलपेक्षा इफेक्टिव्ह कामकाज व्हावे, यासाठी कॉप-२४ ही संकल्पना सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर कामकाजात केले जाणार आहे. स्थानिक पोलिसांचे बीट मार्शल बंद करून पुर्ण काळ ७०० कर्मचारी दोन सत्रात पेट्रोलिंग करणार आहेत. या कॉप-२४ चे कामकाज गुन्हे शाखेकडून चालणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात ४ कर्मचारी दोन सत्रात काम करतील. त्यामुळे पुणेकरांना मदत, गुन्हेगारीला चाप आणि पोलिसांचा राबता देखील शहरात पाहिला मिळणार आहे.

असा आहे कॉप-२४ उपक्रम…

  • कॉप-२४ मध्ये ५०० पुरूष कर्मचारी व २०० महिला कर्मचारी असणार.
  • कॉप-२४मधील कर्मचाऱ्यांचे वय २१ ते ३० असणार, जेणेकरून ते तत्पर सेवा देतील.
  • कॉप-२४ च्या माध्यमातून पोलिसांचा रिस्पॉन्स टाईम ७ मिनिटांवरून ५ मिनिटांवर आणण्यासाठी प्रयत्न
  • कॉप-२४ साठी १२५ दुचाकी आणि ३९ चारचाकी वाहने
  • दोन सत्रात (दिवस-रात्र) पेट्रोलिंग, प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक कार
  • पुणे शहरातील महत्वाचे चौक, रस्ते तसेच नागरिकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी कार उभी केली जाणार
  • काही घटना घडल्यास, तत्काळ पोहचून मदत व प्राथमिक कार्यवाही

कॉप-२४ गुन्हेगारांवरही लक्ष ठेवणार…

मोक्का, एमपीडीए, तडीपार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर देखील कॉप-२४ लक्ष ठेवणार आहेत. तडीपार गुन्हेगाराच्या घरी व परिसरात जाऊन तो घरी येतो का हे चेक करणार. सोबतच सराईतांच्या हालचालींवर देेखील कॉप-२४ लक्ष ठेवणार आहेत. तर, एमपीडीए व मोक्कासारख्या गु्न्ह्यातून जामीन मिळविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ज्यामुळे त्यांच्यावर वचक देखील निर्माण होणार आहे.

ड्रेस कोड लक्ष वेधणार…

कॉप-२४ हा उपक्रम पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. पोलिसांचे कामकाज जलद व विश्वासदर्शक तसेच पोलिसांची इमेज बिल्टअप व्हावी, यासाठी प्रयत्न या कॉप-२४ च्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यामुळे एक युनिक असा ड्रेस कोड देखील या कॉपसाठी निवडला जाणार आहे. तो कसा असावा, त्याचा रंग कसा असावा हे पोलीस आयुक्त स्वत: पाहत आहेत.

Web Title: In pune 700 police personnel are going to patrol the entire city nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
2

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
4

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.