Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमानांद्वारे ड्रग्ज तस्करीचा नवा डाव! बँकॉक टू पुणे रूट उघड; तब्बल…

गेल्या काही महिन्यात बँकॉक टू पुणे असा ड्रग्जचा रूट उघड झाला असून, कोट्यवधींचे ड्रग्ज कस्टम विभागाने पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2026 | 11:49 AM
विमानांद्वारे ड्रग्ज तस्करीचा नवा डाव! बँकॉक टू पुणे रूट उघड; तब्बल...

विमानांद्वारे ड्रग्ज तस्करीचा नवा डाव! बँकॉक टू पुणे रूट उघड; तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : पुण्याचा गल्ली-बोळ ते विमानतळाचा परिसर असा ‘ड्रग्ज’चा वर्तुळ शहरात पुर्ण झालेला असल्याचे गेल्या काही वर्षात सातत्याने समोर आले आहे. एकीकडे पुणे पोलिस गल्ली बोळातून ड्रग्ज शोधत असतानाच कस्टमचा विभाग परदेशातून हवाई-मार्गे येत असलेले ड्रग्ज पकडत आहेत. एकूणच पुण्याच्या वाढत्या औद्योगिककरण अन् विस्तारात ड्रग्जचे जाळे देखील मोठ्या प्रमाणात फोफावत चालले असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यात बँकॉक टू पुणे असा ड्रग्जचा रूट उघड झाला असून, कोट्यवधींचे ड्रग्ज कस्टम विभागाने पकडले आहे.

 

पुण्यासह जिल्ह्याचा परिसर वाढत आहे. आयटी क्षेत्र, औद्योगिककरण वाढत आहे. आपसूकच त्यामुळे नागरिककरण देखील मोठ्या संख्येने वाढले आहे. त्यामध्ये उच्चभ्रुपांसून कामगार वर्गांचा समावेश आहे. कामगार वर्गही परराज्यातून सातत्याने पुण्यात स्थलांतरीत होत आहे. तर, परदेशासह विविध राज्यातून तरुण नोकरीनिमित्ताने पुण्यात आला आहे.

या वर्गाला लक्ष करून ड्रग्ज तस्कर देखील त्यांच्या पाठिमागे पुण्यापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचा परिसर या ड्रग्जच्या जाळ्यात अडकला गेला आहे. गेल्या काही वर्षात गल्ली-बोळपासून उच्चभ्रू परिसर तसेच विमानतळाचा परिसर ड्रग्स तस्करीच्या रॅकेटमध्ये पाहिला जात लागला आहे.

नुकतचे सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययु) कारवाई करत तब्बल पाच जणांना अटक केली. त्यांच्या बॅगेतून चॉकलेट बॉक्समध्ये लपवून आणलेला तब्बल सुमारे ८ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. अटक केलेल्या पाचपैकी चौघे मूळचे झारखंडमधील असून ते बँकॉकहून पुण्यात आले होते. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून येणाऱ्या विमानाने हे ड्रग्ज सातत्याने पुण्यात येत आहेत. कस्टम विभाग हे सातत्याने पकडून हे रॅकेट उघड करत आहेत. हे ड्रग्ज आणण्यासाठी हे तस्कर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत. मात्र, हे कस्टमच्या नजरेतून सुटत नसल्याचेही दिसत आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानांनंतर येथून देशांतर्गत उड्डाणांद्वारे हा माल देशातील इतर शहरांत पाठवण्याचा तस्करांचा डाव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे शहराला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

‘तस्कर’ वेब सिरीजचा प्रकार

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि चर्चेत असलेल्या ‘तस्कर’ या वेब सिरीजमध्ये दाखविलेल्या पद्धतीप्रमाणेच विमानमार्गे ड्रग्स तस्करी होत असल्याचे समोर येत आहे. पुण्यासारख्या शहरात ही तस्करी होत आहे. थायलंड देशाची राजधानी बँकॉक येथून पुण्याकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केली जात असून, दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले बँकॉक हे शहर आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे केंद्र असल्याचीही चर्चा आहे.

९ मार्च रोजी चॉकलेट बॉक्समधून ८ कोटी रुपयांचा गांजा जप्त करून पाच जणांना अटक केली.

५ मार्च रोजी विमानातील बाथरूममधील टिश्यू कॅबिनेटमध्ये ७४ लाख रुपयांचा गांजा आढळून आला.

१८ फेब्रुवारीला लहान मुलांच्या खेळण्यातून तब्बल ५ कोटी ३२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला.

१२ डिसेंबर रोजी चिप्सच्या पाकिटांतून ७४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, एका महिलेला अटक

८ डिसेंबर रोजी एका प्रवाशाच्या बॅगेतून २ कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त केला

कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटने गेल्या वर्षात गांजा, मेफेड्रोनयासह वेगवेगळ्या ड्रग्जप्रकरणात एकूण ६ जणांना अटक केली. यामध्ये गांजात तिघांना पकडून त्यांच्याकडून २९ लाख २० हजारांचा गांजा, तसेच मेफेड्रोन (एमडी) ड्रग्जप्रकरणात दोन जणांना अटक करून १५ लाखांचे ड्रग्ज पकडले. तर, वेगवेगळ्या तीन ड्रग्जमध्ये ६ लाखांचा ऐवज पकडत एकाला अटक केली.

हे सुद्धा वाचा : पिस्तूल मित्रांना दाखविताना गोळी सुटली अन् थेट…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Web Title: In the last few months the customs department has taken major action by seizing drugs worth crores of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Drugs Case
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले
1

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
2

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
3

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.