Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळा खंडाळा परिसरात चोरीच्या घटनेत वाढ; लाखोंचा ऐवज लंपास, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

पुण्यातील लोणावळा व खंडाळा परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. जुजी कॉलनी येथील एका बंगल्यात भरदिवसा चोरीची घटना घडली असून लाखो रुपयांचा ऐवज चोरला.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 11, 2025 | 04:15 PM
Increase in theft and burglary incidents in Lonavala Khandala area Pune Crime News

Increase in theft and burglary incidents in Lonavala Khandala area Pune Crime News

Follow Us
Close
Follow Us:
वडगाव मावळ : लोणावळा खंडाळा परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. खंडाळा परिसरातील राजुजी कॉलनी येथील एका बंगल्यात भरदिवसा चोरीची घटना घडली. या घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल 26 लाख 26 हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. ही चोरीची घटना 09 जून 2025 रोजी सकाळी उघडकीस आली.
वीणा नारायण मुळे (वय ६५ वर्षे, रा. भवानीप्रसाद बंगला, राजुजी कॉलनी, घुगळे बँक हाऊस शेजारी, जुना खंडाळा, लोणावळा) यांनी याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, फिर्यादींच्या बंगला परिसरातील मुख्य गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान दागिने लंपास केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खंडाळामध्ये घडलेल्या या घरफोडी आणि चोरीच्या घटनेमध्ये चोराने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये
१२ तोळ्यांच्या ६८ ग्रॅंमच्याा सोन्याच्या बांगड्या (मूल्य – ₹७,२०,०००) ८ तोळ्यांच्या ६४ ग्रॅंमच्या सोन्याच्या पाटल्या (मूल्य –
₹४,८०,०००), ५ तोळ्यांच्या २ सोन्याच्या साखळ्या (मूल्य ₹३,००,०००), १० तोळ्यांचे दोन शिंदेशाही तोडे (मूल्य ₹६,००,०००) १.५ तोळ्याची सोन्याची अंगठी (मूल्य ₹९०,०००),  ६ ग्रॅमचे ३ सोन्याचे कानातले जोड (मूल्य ₹३६,०००), ८.९ तोळ्यांचे दोन  सोन्याचे नेकलेस (मूल्य ₹५,४०,०००),  १ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या (मूल्य ₹६०,०००) तसेच २ किलो चांदीचे भांडे व पूजावस्तू (मूल्य ₹१,००,०००) चोरले होते. या चोरीमध्ये एकूण चोरी गेलेला ऐवज २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 
ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी घडली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. सदर गुन्ह्याची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे. खंडाळा परिसरात पूर्वीही अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कराडमध्ये AIच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ 
साताऱ्यातील कराडमधून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वत:ला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे. हे व्हीडीओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले. हे प्रकार सोशल मीडियावर वायरल होऊ नयेत म्हणून पीडित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Web Title: Increase in theft and burglary incidents in lonavala khandala area pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • crime news
  • Lonavala news
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप
1

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ
2

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
3

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
4

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.