crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
डोंबिवली येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. हाय प्रोफाईल सोसायटीत दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले. केवळ बॉल अंदर आला म्हणून त्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांचे हात बांधून त्यांना मारहाण केल्याचे समोर आला आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवली नजीक असलेल्या हाय प्रोफाइल पळवा सिटीत कासा बेला गोल्ड सोसायटी आहे. बुधवारी संध्याकाळी त्याच सोसायटीतील लहान मुले सोसायटीच्या गार्डनमध्ये हॉली बॉल खेळत होती. खेळत असताना बॉल एका इमारतीत गेला. बॉल आणण्यासाठी मुले इमारतीत गेली. तर तिथे सुरक्षा रक्षकांनी पकडले. तुमच्यामुळे गाड्यांच्या नुकसान झाले असे म्हंटले आणि त्यांचे हात बांधले. तो येवढ्यावरच थांबवा नाही तर त्यांचे हात बांधल्यावर त्यांना मारहाण देखील केली असा आरोप या मुलांनी केला आहे.
अरेरावी करत होता
यानंतर या दोघांपैकी एका मुलाचे पालक राजेंद्र खंदारेकडे गेले. त्याचा याबाबत जाब विचारला. मात्र खंदारे याने मुलांच्या पालकांसोबत पण मुजोरी केली. मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही काय पण करा. त्याचे अरेरावी वाढत होती. त्याने केलेली चुक तो मान्य करायला तयार नव्हता.
आरोपी अटकेत
हे सर्व पाहाता या नंतर याची माहिती मुलांच्या पालकांनी सोसायटीचे चेअरमन योगेश पाटील यांना दिली. योगेश पाटील यांनी या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. अमानुष कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षक राजेंद्र खंदारेला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो दारूच्या नशेत असल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. मात्र या घटनामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण
अंबरनाथमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध आर्थोपेडिक डॉक्टरच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला ही डोंबिवली येथील रहिवासी आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केले असल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या पतीची मृत्यू झाली असून त्यांच्या उपचारादरम्यान पीडितेची आणि डॉक्टरची ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत डॉक्टरने तिला लग्नाचे आमिष दाखवत सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप आहे. या घटनेने अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे