crime (फोटो सौजन्य: social media )
पुणे: पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आकुर्डी येथील डी टू सी कमर्शियल दुकानासमोर घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
Nagpur : कर्जबाजारीपणातून वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, पतीचा मृत्यू तर पत्नी मृत्यूशी झुंजत
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे डी टू सी कमर्शियल दुकानासमोर सायबेरियन हस्की जातीचा कुत्रा बसला होता. त्या कुत्र्याला अचानक एका अज्ञातव्यक्तीने लक्ष्य केले. सुरुवातीला त्याने दगडाने वार केले नंतर लाकडी दांडक्याने एकामागून एक जोरदार प्रहार करून कुत्र्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतावस्थेत कुत्र्याला फरफटत रस्त्यावर आणले.
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून प्राणीप्रेमींनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दुकानाच्या मालकाने तातडीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 325, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील कलम 11(1) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
निगडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात सुरु केले आहे. आरोपी कोण आहे, त्याचे हेतू काय होते, त्याने हे का केलं, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही आहे. पोलिसांच्या तपासानंतर या मागचं कारण स्पष्ट होईल. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार
पुण्यातील उत्तमनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून, त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्या एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
प्रथमेश चिंटू आढळ (वय. 19,रा. कोंढवे धावडे) असे जखमी तरुणाचे नाव असून, सद्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी (दि. 11) रात्री आठ वाजताच्या सुमारास आर. आर. वाईन्स जवळ उत्तमनगर परिसरात घडली आहे. यावेळी टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी, उत्तमनगर पोलिसांनी करणसिंह सुरेंद्रसिंह गचंड (वय. 20,रा. आरती निवास, मनिषा थेटर जवळ उत्तमगर) याला अटक केली असून, त्याच्यासोबतच्या तिघा अल्पवयीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.