
आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड नेटवर्कचा भंडाफोड! सीबीआयने केली देशव्यापी कारवाई; १००० कोटींचा घोटाळा उघड
Cyber Crime News: ऑनलाइन गुंतवणूक, कर्ज आणि नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आणि संघटित सायबर फ्रॉड नेटवर्कचा केंद्रीय तपास ब्यूरो (सीबीआय) ने पर्दाफाश केला आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून देश-विदेशात १००० कोटींपेक्षा अधिक रकमेची हेराफेरी झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात सीबीआयने १७ आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ४ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, तसेच ५८ कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
चीनशी संबंधित सायबर ठगांचे जाळे उघड
सीबीआयच्या ‘ऑपरेशन चक्र व्ही’ अंतर्गत चीनशी संबंधित आंतरराष्ट्रीय सायबर ठगांचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. तपासात जू यी, हुआन लियू, बेइजियान लियू व गुआनहुआ वांग या परदेशी नागरिकांचा सहभाग समोर आला. २०२० पासून भारतात बनावट कंपन्या स्थापन करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
देशभर पसरलेले जाळे, नागरिकांची फसवणूक
सीबीआयच्या तपासानुसार, हे सायबर फ्रॉड नेटवर्क देशातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय होते. भ्रामक लोन अॅप्स, बनावट गुतवणूक स्किम्स, पीझी व एमएलएम मॉडेल्स, खोटवा पार्ट-टाईम जॉब ऑफर्स आणि फसव्या ऑनलाइन गैमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. विविध स्वरुपातील फसवणूक असली तरी त्यामागे एकाच सिडिकेटचा हात असल्याचे तपासातून समोर आले आहे.
हाय-टेक पद्धतीने फसवणूक
तपासात समोर आले की, गुन्हेगारांनी अत्यंत लेयर्ड आणि टेक्नॉलॉजी डिव्हन पद्धती वापरल्या, गुगल जाहिरात, बल्क एसएमएस, पजायाम-बॉक्स आधारित मेसेजिंग सिस्टम, काषउड इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक प्लॅटफॉर्म्स आणि अनेक म्यूल बैंक आउट्सचा वापर करून खऱ्या सूत्रधाराची ओळख लपवण्यात आली.
या नेटवर्कची कणा म्हणून १११ शैल कंपन्या उभ्या करण्यात आल्या होत्या. हमी डायरेक्टर्स, बनावट कागदपत्रे, खोटे पते आणि भ्रामक व्यावसायिक उद्देश दाखवून या कंपन्या नोंदवण्यात आल्या, त्यांच्याच नावावर बैंक अकाउंट्स आणि पेमेंट गेटवे मर्वेट अकाउंट्स उघडून गुन्ह्याची रक्कम लेयरिग आणि डायव्हर्जनसाठी वापरण्यात आली. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध प्रदेश, झारखंड आणि हरयाणा येथे एकूण २७ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली