Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या पोलीस निरिक्षकाची चौकशी करा!

हत्येच्या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी अल्पयीन मुलाला अटक केली. गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन असताना केवळ पैशाची पूर्तता न केल्याने पोलीस निरिक्षक समाधान वाघ यांनी न्यायालयाची दिशाभूल करून मुलाच्याविरोधात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करून अल्पवयीन मुलाच्यावतीने त्याच्या वडीलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 14, 2022 | 10:27 AM
न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या पोलीस निरिक्षकाची चौकशी करा!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एका हत्येच्या गुन्ह्यात (Murder Case) अल्पवयीन मुलाला (Minor Boy) मुख्य आरोपी (Chief Accuse) दाखवून बाल न्याय मंडळाची (Juvenile Justice Board) दिशाभूल करणाऱ्या दिंडोशी पोलीस (Dindoshi Police) ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला (Police Inspector) हे प्रकरण चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप करणार्‍या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षकाची चौकशीचे करण्याचे आदेश पोलीस उपाआयुक्तांना दिले.

हत्येच्या प्रकरणात दिंडोशी पोलिसांनी अल्पयीन मुलाला अटक केली. गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन असताना केवळ पैशाची पूर्तता न केल्याने पोलीस निरिक्षक समाधान वाघ यांनी न्यायालयाची दिशाभूल करून मुलाच्याविरोधात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करून अल्पवयीन मुलाच्यावतीने त्याच्या वडीलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुलाला केलेली अटक चुकीची असूनही मुलगा अल्पवयीन असल्याने बाल सुधारगृहात ठेवण्यात यावे, अशी विनंतीही याचिकेत केली. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

पोलिसांनी आरोपी अल्पवयीन असल्याने डोंगरी येथे बाल न्याय मंडळासमोर हजर केले आणि बालसुधारगृहात ठेवले. परंतु, काही दिवसांनंतर पोलीस निरिक्षक समाधान वाघ यांनी मुलाच्या वयाशी संबंधित कागदपत्रे मागितली. त्यानुसार, तो शिकत असलेल्या शाळेने दिलेले प्रमाणपत्र आणि आधार ओळखपत्र आरोपीच्या वडिलांनी वाघ यांना दिले. त्यावर मुलाची जन्मतारीख ४ जून २००५ नमूद करण्यात आली होती. यावेळी, वाघ यांनी मुळ प्रती परत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्याची पूर्तता न केल्याने वाघ यांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज करून आरोपीचे वय जाणून घेणार्‍या चाचणीसाठी परवानगी मागितली.

मंडळाच्या परवानगीनंतर त्याची नागपाडा पोलीस रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचे वय २० ते २१ वर्षे असल्याचे नमूद करण्यात आल्याने बाल न्याय मंडळाने वाघ यांना आरोपीला नियमित न्यायालयासमोर हजर करण्यास परवानगी दिल्याचा दावा याचिकाकर्त्याकडून करण्यात आला. त्याची गंभीर दखल खंडपीठाने घेत पेालीस निरीक्षक वाघ यांच्या विरोधात चौकशी करण्याची करण्याचे पोलीस उपायुक्तांना आदेश दिले. तसेच, आरोपच्या अल्पवयीन संदर्भात सर्व कागदपत्रांची पडताळणी करून न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्यात यावे असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

Web Title: Investigate the police inspector who misled the court nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 10:27 AM

Topics:  

  • Murder Case
  • Police Inspector

संबंधित बातम्या

Crime News Updates : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना
1

Crime News Updates : भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला तिघांकडून बेदम मारहाण, बीडमधील घटना

उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट…
2

उत्तम जाधव खूनप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी टोळीप्रमुखासह 12 जणांवर थेट…

चुलतीला I Love You म्हटल्याने पुतण्याला आला राग; हॉकी स्टीकने मारहाण करुन केला खून
3

चुलतीला I Love You म्हटल्याने पुतण्याला आला राग; हॉकी स्टीकने मारहाण करुन केला खून

Crime News Updates : भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला धारदार शस्त्राने वार करुन संपवलं
4

Crime News Updates : भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला धारदार शस्त्राने वार करुन संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.