Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बालिकाश्रम रोडवरील न्यु आर्ट्स कॉलेजच्या मागील गेटसमोर एका ५५ वर्षीय इसमावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 03:31 PM
अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट!
  • २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
  • पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
अहिल्यानगर : बालिकाश्रम रोडवरील न्यु आर्ट्स कॉलेजच्या मागील गेटसमोर एका ५५ वर्षीय इसमावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत सुरज रवी सोनवणे आणि प्रेम उर्फ सोनुल्या रवी सोनवणे या दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हा खून नेमका कशामुळे व कसा घडला याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत. अल्पावधीतच आरोपींना अटक केल्याबद्दल तोफखाना पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार मंधन रवींद्र चव्हाण यांचे वडील रवींद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) हे ७ ऑक्टोबरला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बालीकाश्रम रोडवरील एशियन फूड कोर्ट हॉटेलसमोरून जात होते. यावेळी आरोपींच्या मोटारसायकलला चव्हाण यांच्या मोटारसायकलचा कट लागल्याने एका आरोपीची चप्पल तुटली होती. याच किरकोळ कारणावरून आरोपींचा राग अनावर झाला. याच रागातून आरोपी सुरज रवी सोनवणे, प्रेम उर्फ सोनुल्या सोनवणे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून रवींद्र चव्हाण यांच्या पाठीवर आणि हातावर धारदार हत्याराने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान रवींद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींना तोफखाना पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, हा खून नेमका कशामुळे व कसा घडला याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत. अल्पावधीतच आरोपींना अटक केल्याबद्दल तोफखाना पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा : येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

आरोपी पकडल्याने समाधान 

बुधवारी दुपारनंतर घडलेल्या या घनटेत बळी गेलेले आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकाचे वडील होते. त्यामुळे नेमकी घटना काय आहे, यामागे नेमके कारण काय आहे, याची उत्सुकता नगरकरांना होती. केवळ गाडीचा कट लागल्याने खून होऊ शकतो, यावरही आश्चर्य व्यक्त होत होते. मृताच्या नातेवाईकांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार जगताप यांनीही याप्रकरणात लक्ष घातले होते. या पार्श्वभूमीवर आरोपींना २४ तासांत जेरबंद केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: The police have arrested two individuals in connection with a murder case in ahilyanagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
1

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
2

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार
3

गस्तीवरील पोलिसावर आठ जणांच्या टोळक्याचा हल्ला; तरुणीने चाकूने केले सपासप वार

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
4

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.