Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देत नसल्याच्या रागातून सावत्र नातवाने आपल्या ६५ वर्षीय सावत्र आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपळे गुरव येथे घडली आहे. ओंकार किसन शिंगोरे (वय २६) असे आरोपीचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 05:09 PM
पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

Follow Us
Follow Us:
  • मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार
  • सावत्र नातवाने केली आजीची हत्या
  • पिंपळे गुरवमधील घटनेनं खळबळ
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीच्या गंभीर घटना घडत आहेत. अशातच आता प्रॉपर्टीमध्ये हिस्सा देत नसल्याच्या रागातून सावत्र नातवाने आपल्या ६५ वर्षीय सावत्र आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपळे गुरव येथे घडली आहे. ओंकार किसन शिंगोरे (वय २६) असे आरोपीचे नाव असून, मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६५) असे मृत आजीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

पिंपळे गुरव येथील कृष्णा चौकात गणेश सहकारी बँकेच्या शेजारील इमारतीत शिंगोरे कुटुंबीय राहत होते. प्रॉपर्टीतील हिस्सा देण्याच्या मुद्द्यावरून आरोपी आणि त्याच्या सावत्र आजीमध्ये वाद होता. याच कारणातून आरोपीने आजीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

खून केल्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

आजीची हत्या केल्यानंतर आरोपी ओंकार शिंगोरे स्वतः सांगवी पोलीस ठाण्यात गेला. तेथे त्याने आजीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सांगलीत महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा; हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या विजयाचा निर्धार

आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार शिंगोरे याच्यावर यापूर्वी खुनाचा एक गुन्हा, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा तसेच अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून घडलेल्या या हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी, घटनाक्रम आणि अन्य बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Web Title: An incident has occurred in pimple gurav where a step grandson murdered his grandmother nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
1

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
2

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
3

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
4

वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी चक्क दाताने दाताने तोडून चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.