crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुण्यातील गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निलेश घायवळवरती गंभीर गुन्हे असताना त्याने खोटा पता देत पासपोर्ट मिळवला आणि थेट स्वित्झर्लंडला पळाला. घायवळ गँगच्या गुंडांनी काही करण नसताना आम्ही इथले भाई आहोत म्हणत सामान्य नागरिकावर गोळीबार केला तर एकावर कोयता हल्ला करण्यात आला. मात्र या घटनेने निलेश घायवळचा पाय खोलात गेला. जेव्हा पुणे पोलिसांनी घायवळची दहशत मोडीत काढायची ठरवलं आणि चौकशीसाठी बोलवल तेव्हा कळाल की निलेश घायवळ भारताबाहेर गेला आहे. मात्र त्याने पोलिसांची आणि पासपोर्ट कार्यालयाची फसवणूक करत ९० दिवसांचा पासपोर्ट मिळवला. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असताना त्याने पासपोर्ट मिळवलाचं कसा ?
निलेश घायवळ याच्या घरी पुणे पोलिसांची धाड
निलेश घायवळच्या संपत्तीचा शोध सुरू आहे. त्याच्या नाड्या आवळण्यासाठी त्याची बँक खाती पुणे पोलिसांनी गोठवली आहेत. घायवळ ताब्यात यावा यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याला लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. काल पुणे पोलीस घायवळच्या घरी गेले घरातील सदस्यांची चौकशी करावी हा हेतू होता .मात्र घरात कोणीही आढळून आल नाही. घरातील सदस्य पण बाहेर गेले आहेत. मात्र आता घायवळ गँगची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींची धिंड पोलिसांनी काढली होती. मात्र आता थेट पोलिसांनी बँक खाती गोठवत त्याच्या नाड्या आवळल्या आहेत.
राजकीय व्यक्तीमुळे पासपोर्ट मिळाला विरोधी पक्षाची टीका
निलेश घायवळ याचे राजकीय संबंध आहेत . त्याचा फायदा त्याने घेत पासपोर्ट मिळवला त्याला राजकीय व्यक्तीने मदत केली आहे असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला होता . गुंडांना राजकीय वरदहस्त मिळतोय ते पळून जातात हे अजब आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे . मात्र निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाल्यानंतर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत .
पोलीस व्हेरिफिकेशन कस झालं ?
गंभीर गुन्हे दाखल आहेत हे पोलिसांना माहिती नव्हत का ?
गंभीर गुन्ह्यात आरोपी असताना ही पोलिसांनी मोकळीक दिली कशी ?
देशभरात पळून जाताना पण खोटा पत्ता देत फसवणूक केली
निलेश घायवळच्या गँगवर पुणे पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे . मात्र आता जो पर्यंत घायवळ व्हिसा संपवून भारतात येत नाही तो पर्यंत तरी त्याला काही करता येणार नाही . मात्र भारतात येताच त्याला बेड्या घातल्या जातील . निलेश घायवळची संपत्ती जप्त केल्यावर तो शरण येतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Pune Crime: फॉरेन्सिक रिपोर्टने खडसेंचे जावई वाचले! ड्रग्सच सेवन केल नाही रिपोर्टमध्ये स्पष्ट