Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…

तुषारचे वडील हयात नाहीत. त्याचा भाऊ मोर्शी तालुक्यातील मूळ गावी राहतो. घरात मुलगा आणि आई दोघेच राहत होते. तुषार काही दिवासांपासून घरूनच नोकरी करत होता. त्याचे वार्षिक पॅकेज तब्बल २० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 11, 2026 | 08:01 AM
आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा आवळून खून

आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा आवळून खून

Follow Us
Follow Us:
  • आरोपी आयटी इंजिनिअरला 20 लाखांचे वार्षिक पॅकेज
  • आई काहीतरी लपवत असल्याचा संशय
  • आईची हत्या करून स्वत: पोलिस ठाण्यात हजर
अमरावती : एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईचा गळा आवळून जीव घेतल्याची धक्कादायक घटना शहरातील गाडगेनगर परिसरात उघडकीस आली. रंजना सतीश कानफाडे (वय ६५) असे मृताचे नाव आहे. त्यांचा मुलगा तुषार तुषार सतीश कानफाडे (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. त्याने घटनेनंतर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आई आपल्याशी नीट बोलत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गजानन प्लाझा परिसरातील रिंग रोडजवळील घरात रंजना आणि तुषार हे दोघे राहत होते. तुषार हा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता असून, पुण्यात वास्तव्यास राहून फ्रान्समधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. घरून काम करण्याची सुविधा असल्यामुळे तो अधूनमधून अमरावतीला येत असे. आई आणि मुलामध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळीही दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. आई आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही, अशी तुषारची तक्रार असल्याचे समोर आले आहे. वादाचे रूपांतर गंभीर घटनेत झाले. तुषारने आई रंजना यांचा गळा आवळला. यात त्यांचा मृत्यू झाला.

‘ड्रोन’ उडवणं भोवलं ! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

दरम्यान, घटनेनंतर तुषार स्वतः गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोहोचून त्याने आईच्या हत्येची माहिती दिल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी तुषारला अटक करण्यात आली. हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी तपासली जात आहे. घरातील मतभेद इतक्या टोकाला पोहोचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या घटनेतील अन्य बाबी स्पष्ट होणार आहेत.

आई काहीतरी लपवत असल्याचा संशय

तुषारचे वडील हयात नाहीत. त्याचा भाऊ मोर्शी तालुक्यातील मूळ गावी राहतो. घरात मुलगा आणि आई दोघेच राहत होते. तुषार काही दिवासांपासून घरूनच नोकरी करत होता. त्याचे वार्षिक पॅकेज तब्बल २० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून माय-लेकात खटके उडत होते. आई आपल्यापासून काही तरी लपवत आहे आणि चुकीच्या गोष्टी सांगत आहे, असा संशय तुषारच्या मनात बळावला होता. याच रागाच्या भरात शनिवारी त्याने टोकाचे पाऊल उचलत आईचा गळा आवळून खून केला.

Web Title: It engineer murder his mother incident in amravati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Amravati crime
  • crime news
  • Murder Case
  • Woman Murder

संबंधित बातम्या

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
1

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
2

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
3

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या
4

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.