पुण्यात महिला असुरक्षितच, भररस्त्यात प्राध्यापिकांकडे पाहून अश्लिल शेरेबाजी; आता पोलीसांनी...
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकाने प्राध्यापिकेकडे पाहून अश्लिल शेरेबाजी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच आरोपीने मुलाला इग्लिश स्पोकनचा क्लास लावायच्या नावाखाली प्राध्यापीकेचा नंबर मिळवून महिलेला मॅसेज केले आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात ज्योशुआ आयरलंड (वय ३५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका ४७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार १४ नोव्हेबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी सांगितले, की तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर मनास लज्जा उत्पन्न होईल असा मेसेज केला. तसेच आरोपी हा महिलेच्या घराजवळ नेहमी मित्रांसोबत उभा राहून त्या मुलांना शाळेत सोडवायला जाताना व कामावरून घरी येता-जाता आरोपी तिला पाहून अश्लिल शेरेबाजी करत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. महिलेची इच्छा नसताना तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा पाठलाग करत होता. महिलेला मॅसेजही करत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे. तपास सहायक निरीक्षक डॉ. अरिफा मुजावर करत आहेत.
हे सुद्धा वाचा : हडपसरमधील ‘त्या’ चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ व्यक्त
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : मुंबईत सेलिब्रिटी अन् गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर…; नाना पटोलेंचा सवाल