Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार

व्यवसायासाठी घेतलेल्या एक कोटी रुपयांच्या कर्जापोटी व्याजासह एक कोटी दहा लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार लातुरात समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2026 | 01:05 PM
1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार

Follow Us
Follow Us:
  • 1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी
  • लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार
  • प्लॉटच्या कागदपत्रांसाठी धमकी
लातूर : व्यवसायासाठी घेतलेल्या एक कोटी रुपयांच्या कर्जापोटी व्याजासह एक कोटी दहा लाख रुपये परत केल्यानंतरही आणखी तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार लातुरात समोर आला आहे. पैसे देण्यासाठी दबाव आणत अपहरण करून वसुली करण्याची, जीवे मारण्याची तसेच कुटुंबीयांना त्रास देण्याची धमकी दिल्याचा आरोप एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने केला आहे. एवढेच नव्हे, तर प्लॉटच्या मूळ नोंदणी दस्तऐवजांची बळजबरीने उचल करून मालमत्ता नावावर करून देण्यासाठी दबाव आणल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्लॉटच्या कागदपत्रांसाठी जीवे मारण्याची धमकी

अविनाश अमर कामदार (वय ५४, व्यवसाय रिअल इस्टेट, रा. लातूर) यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत हा घटनाक्रम नमूद केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून व्यवसायातील आर्थिक गरज भागविण्यासाठी जून-जुलै २०२६ मध्ये त्यांना पैशांची आवश्यकता होती. त्यावेळी लातूर येथील परिचित विश्वास अंबेकर यांनी रायवाडी येथील गणेश बोमणे याची त्यांच्याशी ओळख करून दिली. एक कोटी दहा लाख रुपये परत दिल्यानंतरही गणेश बोमणे याने आपण प्रतिदिवस एक टक्का व्याजदराने पैसे दिले असल्याचे सांगून, दिलेली रक्कम सोडून व्याज आणि मुद्दल असे एकूण तीन कोटी रुपये बाकी असल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. ही रक्कम तातडीने द्यावी, अन्यथा अपहरण करून घेऊन जाऊन पैसे वसूल करू, अशा स्वरूपाच्या धमक्या फोनवरून दिल्या जात होत्या. बोमणे याच्यासोबत स्वप्नील, आणि खरोसेअप्पा, हे दोघेही येत होते.

सुरुवातीला दोन व पाच लाखांचे व्यवहार

गणेश बोमणे याने सुरुवातीला दोन लाख आणि त्यानंतर पाच लाख रुपये व्याजाने दिले होते. तक्रारदाराने हे पैसे व्याजासह परत केल्याचे जबाबात नमूद केले आहे. त्यानंतर अधिक पैशांची तातडीची गरज निर्माण झाल्याने त्यांनी गणेश बोमणे याच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली. त्यानुसार बोमणे याने लातुरातील एक नंबर चौक परिसरातील टीटीएस शोरूमच्या बाजूला कारमध्ये बसून टप्प्याटप्याने वारंवार रोख स्वरूपात एक कोटी रुपये दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या व्यवहारात प्रतिदिवस एक टक्का व्याज ठरले होते, असे तक्रारीत नमूद आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने व्याजासह एक कोटी दहा लाख रुपये रोख स्वरूपात परत दिल्याचा दावा अविनाश कामदार यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर फरार पतीने उचलले टोकाचे पाऊल; शेतातील आग लावून…

प्लॉटची मूळ रजिस्ट्री बळजबरीने नेली

या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे देशीकेंद्र शाळेजवळील प्लॉटच्या मूळ रजिस्ट्रेशनची कागदपत्रे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी धमकी देऊन गणेश बोमणे याने बळजबरीने घेऊन गेल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी गणेश बोमणे हा एमजी हेक्टर कारमधून त्यांच्या कार्यालयात आला. त्यावेळी तीन कोटी रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर देशीकेंद्र शाळेजवळील प्लॉट त्याच्या नावावर करून देण्यासाठी नोंदणी करून घ्यावी, असा दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लातूरमधील या प्रकरणात किती रकमेची मागणी करण्यात आली?

    Ans: तक्रारदाराने एक कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापोटी व्याजासह एक कोटी दहा लाख रुपये परत केल्यानंतरही आरोपींकडून आणखी तीन कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे.

  • Que: तक्रारदाराला कोणत्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या?

    Ans: पैसे न दिल्यास अपहरण करून वसुली करणे, जीवे मारणे आणि कुटुंबीयांना त्रास देणे, अशा धमक्या फोनवरून देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

  • Que: प्लॉटच्या कागदपत्रांबाबत काय प्रकार घडला?

    Ans: देशीकेंद्र शाळेजवळील प्लॉटच्या मूळ नोंदणी कागदपत्रे धमकी देऊन बळजबरीने नेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तीन कोटी रुपये न दिल्यास हा प्लॉट आरोपीच्या नावावर करून देण्यासाठी नोंदणी करण्याचा दबाव आणल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

Web Title: A serious case of illegal money lending has come to light in latur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur Crime

संबंधित बातम्या

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…
1

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
2

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ
4

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्तीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांना घरं सोडण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.