पिंपरी चिंचवड करंडक (फोटो- सोशल मिडिया)
सह्यांद्री किंग्ज्, विन टेंपल क्लब उपांत्य फेरीत
‘पिंपरी चिंचवड करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धा
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा
पुणे/Cricket: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत सह्यांद्री किंग्ज् आणि विन टेंपल क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुशील जाधव याने केलेल्या ६४ धावांच्या जोरावर सह्यांद्री किंग्ज् संघाने २नाईन स्पोर्ट्स क्लब पुणे संघाचा पाच गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना २नाईन स्पोर्ट्स क्लबने ११९ धावा धावफलकावर लावल्या. प्रद्युम्न आटपाडकर (३३ धावा) आणि हिमांशु यादव (१९ धावा) यांनी संघाचा डाव सावरला. लोकेश चौधरी याने तीन गडी बाद केले. सईश शिंदे आणि मयुर गोखले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे लक्ष्य सह्यांद्री किंग्ज्ने ११.१ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. सुशील जाधव याने ३६ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ६४ धावा फटकावल्या आणि संघाचा विजय निश्चित केला.
Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी
सुहेल श्रीखंडे याने फटकावलेल्या ६६ धावांच्या जोरावर विन टेंपल क्लबने अव्दिका स्पोर्ट्स क्लबचा ९१ धावांनी सहज पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विन टेंपल क्लबने २० षटकामध्ये २३१ धावांचा डोंगर उभा केला. सुहेल श्रीखंडे ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. याशिवाय संकेत माने (४५ धावा), हरी सावंत (३२ धावा) आणि हर्षल हाडके (२१ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना अव्दिका स्पोर्ट्स क्लबचा डाव १४० धावांवर संपुष्टात आला. देवराज बेर्डे याने ६६ धावांची खेळी करून अव्दिका संघाकडून प्रतिकार केला. विन टेंपलच्या हरी सावंत याने चार गडी तर, वेदांत कानपीळे याने तीन गडी बाद केले.
२नाईन स्पोर्ट्स क्लब पुणे : १९.५ षटकात १० गडी बाद ११९ धावा (प्रद्युम्न आटपाडकर ३३, हिमांशु यादव १९, लोकेश चौधरी ३-२५, सईश शिंदे २-२२, मयुर गोखले २-२२) पराभूत वि. सह्यांद्री किंग्ज ११.१ षटकात ५ गडी बाद १२३ धावा (सुशील जाधव ६४, सुशांत अभंग १८, सारंग बावळे २-८); सामनावीर : सुशील जाधव
IND Vs NZ: किवींनी लाज राखली बरं! 4 थ्या T-20 मध्ये न्यूझीलंडकडून भारताची दाणादाण, तब्बल 87 रन्सने…
विन टेंपल क्लब : २० षटकात ८ गडी बाद २३१ धावा (सुहेल श्रीखंडे ६६, संकेत माने ४५, हरी सावंत ३२, हर्षल हाडके २१, पुष्कर बोऱ्हाडे २-४३, देवराज बेर्डे २-६१) वि. वि. अव्दिका स्पोर्ट्स क्लबः १७.५ षटकात १० गडी बाद १४० धावा (देवराज बेर्डे ६६, विशाल गव्हाणे २९, हरी सावंत ४-३२, वेदांत कानपीळे ३-२५, राकेश जे. २-२४); सामनावीर : सुहेल श्रीखंडे.
Ans: ‘पिंपरी चिंचवड करंडक’ हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू आहे.
Ans: सुहेल श्रीखंडे याने ६६ रन्सची आक्रमक खेळी केली.






