(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
नागपूरच्या कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतवाडा चौकाजवळ संपूर्ण प्रकार घडून आला. तिन्ही मित्र एका एका इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करत होते. याचा व्हिडिओ @motordave2 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात आपल्याला अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात भरधाव वेगाने जाणारी गाडी दिसते. रस्ता मोकळा असतो आणि रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा असतो. अशात काही सेकंदातच वेगाने धावणारी गाडी ट्रकच्या दिशेने जाते आणि ट्रकला जोरदार धडक देते. धडक इतकी जोरदार होती की कार उलटली आणि तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इंटरनेटवर सध्या या घटनेचे दृष्य वेगाने शेअर केले जात आहे.
Nagpur 🚨⚠️ Tata Curvv EV, driven by “minors” (16 & 17 year old)…overspeeding around 5:30am on curve with loose sand/mud…lost control, rear ended parked lorry…2 dead, 1 injured.@DriveSmart_IN @RSGuy_India pic.twitter.com/VdFlFntMTL — Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) August 13, 2026
अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील
विना परवाना गाडी चालवत होता…
प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, गाडीत प्रवास करणारे तिन्ही मित्र हे अल्पवयीन होते. सांगितले जात आहे की, गाडी चालवणारा मिहिर (वय १७ वर्षे) गंभीररित्या जखमी असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही तो गाडी चालवत होता. गाडीवरील नियंत्रण हटले आणि हा सर्व प्रकार घडून आला. भौमिक लारोकर (वय १६ वर्षे) आणि संजय मेलवाणी (वय १७ वर्षे) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिस सध्या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे मृत्यू पावलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.



