Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: ‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात कौटुंबिक वादातून 40 वर्षीय शालिकराम दांडगे यांची मारहाण करून हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पत्नी आणि चार मुलींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 17, 2026 | 09:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून शालिकराम दांडगे यांच्या हत्येचा आरोप.
  • पत्नी आणि चार मुलींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
  • मृताच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्या.
जालना: जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नी आणि चार मुलींनी मिळून आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे घडली. या प्रकरणी मृतकाच्या सावत्र भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नीसह चार मुलींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Raigad Crime: वाद विकोपाला गेला अन्… प्रियकराने प्रेयसीचा घेतला जीव, गळफास घेत स्वतःलाही संपवलं

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृतकाचे नाव शालिकराम शिवाजी दांडगे (वय ४०) असे आहे. शालिकराम दांडगे हे लग्नानंतर सासरच्या जागेत टाकळी येथे घर बांधून पत्नी आणि मुलींसह राहत होते. काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. याच वादातून शालिकराम यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांनी फोन करून ऋषिकेश दांडगे यांना शालिकराम यांच्या मृत्यूची माहिती दिली. ते टाकळी येथे पोहोचले असता शालिकराम यांचा मृतदेह जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला तेव्हा दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर, मनगटाजवळ तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. दोन्ही गुडघे आणि खुब्यांवर निळसर व्रण होते, तर जखमांमधून रक्तस्त्राव झाल्याचेही दिसून आले.

त्या मला मारून टाकतील…

शालिकराम दांडगे हे मृत्यूच्या 15 ते 20 दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी पद्मावती येथे आले होते. तेव्हा त्यांनी पत्नी आणि मुलींकडून वारंवार मारहाण होत असल्याची व्यथा त्यांनी कुटुंबीयांनी सांगितली होती. दोन-तीन महिन्यांपूर्वी अंगावर उकळते पाणी, तिखट आणि मीठ टाकून फेकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. “त्या मला एक दिवस मारून टाकतील,” अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली होती.

पत्नी आणि चारही मुलींवर गुन्हा दाखल

या प्रकरणी शालिकराम दांडगे यांच्या सावत्र भाऊ ऋषिकेश दांडगे यांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नी कोकिळा शालिकराम दांडगे (वय 38 वर्ष), मुलगी नेहा किरण तारू (वय 25 वर्ष, रा. अंधारी), कोमल शालिकराम दांडगे (वय 20 वर्ष) तसेच दोन अल्पवयीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जाफराबाद पोलिस करत आहेत.

पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: शालिकराम शिवाजी दांडगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

  • Que: या प्रकरणात कोणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: पत्नी कोकिळा दांडगे आणि चार मुलींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांना मृतदेहावर काय आढळले?

    Ans: शरीराच्या विविध भागांवर मारहाणीच्या खुणा, निळसर व्रण आणि जखमांचे चिन्ह आढळले.

Web Title: Jalna crime did the fear that they will kill me come true father murdered by wife and four daughters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.