काय घडलं नेमकं?
रोहित पाटील आणि तन्वी ताडकर असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे. रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केली. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पंढरपुरात हत्येचा थरार; तरुणाचा खून करून मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; पाय तोडून लटकवला घरावर
या घटनेची माहिती माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरवर कार आदळली, दोन महिलांचा मृत्यू
रायगड येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून इतर दोघे जण जखमी आहे. रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारणे पाठीमागे धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात कारचा अक्षरशःचेंदामेंदा झाली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मुंबई- गोवा महामार्गावर पोलादपुर तालुक्यात लोहारमाळ गावाच्या हद्दीत हा अपघात घडला. या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दापोली कृषी विद्यापीठ येथे कार्यरत असलेले कर्मचारी अनिल मारकड हे कुटुंबासह नगर येथून दापोलीला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Indapur Crime : इंदापूर तालुक्यात गावठी कट्ट्यासह तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
Ans: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात ही घटना घडली.
Ans: रोहित पाटील आणि तन्वी ताडकर अशी मृतांची नावे आहेत.
Ans: पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.






