Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटक

जालन्यात 19 वर्षीय तरुणाच्या वाढदिवसासाठी पैसे नसल्याने चार मित्रांनी चाकूच्या धाकात एकाला लुटले. 12 हजारांची रोकड हिसकावून पार्टी केली. पोलिसांनी काही तासांतच चौघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 08:27 AM
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवसासाठी पैसे हवेत म्हणून लुटमारीचा कट
  • स्कुटीवरून जाणाऱ्या व्यक्तीला अडवून मारहाण
  • चाकूचा धाक दाखवून 12 हजार रुपये लुटले
जालना: जालन्यातून एक चोरीची घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चार मित्रांनी मिळून एका व्यक्तीला लुटल्याची घटना घडली आहे. चोरी केलेल्या पैश्यांने तरुणांनी नशा करून पार्टी केली. पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Nagpur: नागपूर सायबर पोलिसांचा मोठा खुलासा! ‘शादी डॉट कॉम’वर ओळख वाढवून महिलेला 7.51 लाखांचा गंडा; विदेशी नागरिकासह 3 आरोपी अटकेत

काय नेमकं घडलं?

श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर परिसरातून निलेश अशोक अग्रवाल हे रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या स्कुटीवरून घरी जात होते. यावेळी चार तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. यात अग्रवाल यांच्या नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. चोरांनी त्यांच्याकडील १२ हजार रुपयांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

तरुणांनी लूटमार केल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन मद्यप्राशन आणि जेवणाची जंगी पार्टी केली. अशोक अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला तेव्हा बाळा जगन्नाथ पिंपराळे, दिपक भगवान निर्मल, विशाल धुराजी हिवाळे आणि त्यांच्या एका साथीदाराची माहिती समोर आली.

गुन्हा कबुल

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. तरुणांमधून एका १९ वर्षीय तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पार्टीसाठी पैसे हवे होते म्हणून त्यांनी ही लूटमार केल्याची कबुली दिली. चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

जळगावमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चाकूहल्ला, आरोपी नागरिकांच्या मदतीने ताब्यात

जळगाव येथून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. सिनेस्टाइल पाठलाग करून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या छातीवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. यात तरुण गंभीर झखमी झाला. साई बोराडे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेने संशयितांना नागरिकांनी पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपीचे नाव शुभम सोनवणे असे आहे. जळगाव महापालीकेत उमेदवारांना अर्जाची छाननी सुरु असतांना बाजूच्या मार्केटमध्ये हल्ला झाल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाली होते.

Nashik News: कॉलेज तरुणी आणि 9 वर्षीय मुलगा बेपत्ता; एकाच दिवशी दोन वेगळ्या भागात घडली घटना; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: लुटमारीमागील कारण काय होते?

    Ans: वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी पैसे मिळवणे.

  • Que: लुटीत किती रक्कम हिसकावली गेली?

    Ans: लुटीत किती रक्कम हिसकावली गेली?

  • Que: आरोपींचे पुढे काय झाले?

    Ans: पोलिसांनी काही तासांतच चौघांना अटक केली असून तपास सुरू आहे.

Web Title: Jalna crime robbery committed because they didnt have money for a birthday celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.