प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेने शादी डॉट कॉम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रोफाइल तयार केली होती. त्याच दरम्यान स्वतःला डॉ. मनीष मधूक असे भासवणाऱ्या एका व्यक्तीने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, हळूहळू तिचा विश्वास संपादन करून भारतात येणार असल्याचे आणि भेटीचे आमिष दाखवित आरोपीने विविध कारणे पुढे करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा जमा करण्यास तिला भाग पाडले.तांत्रिक तपासातून खोदली पाळेमुळे तक्रार दाखल होताच सायबर पोलिसांनी ज्या बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग केली होती, त्यांचा सखोल तांत्रिक तपास केला.
या तपासात आरोपींचे लोकेशन पुणे असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन विशेष पथक पुण्याला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपींमध्ये राहुल सतीश चव्हाण (२९), रा. पांचगणी, जि. सातारा, फैजल मोहम्मद फरीद शेख (३१), रा. मोहम्मद वाडी, हडपसर, पुणे, तसेच फ्रान्सिस मासुकू जिम्बा (३१), मूळ रहिवासी मलावी देशाचा नागरिक यांचा समावेश आहे. फ्रान्सिस जिम्बा हा पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तपासात उघड झाले.
बेकायदेशीर वास्तव्य करणारा विदेशी आरोपी
विदेशी आरोपीचा पासपोर्ट आणि व्हिसा ११ जून २०२४ रोजीच संपुष्टात आला. तरीदेखील तो पुण्यात अनधिकृतपणे राहात होता. त्याच्या सूचनेनुसार इतर आरोपींनी बँक खाती उघडली, सर्व कागदपत्रे स्वतःकडे ठेवून फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या मार्गाने वळविली. या टोळीच्या माध्यमातून आणखी सायबर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी तसेच सायबर पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बळीराम सुतार व त्यांच्या पथकाने केली.
Ans: सोशल मीडिया प्रोफाइलवर ओळख वाढवून भावनिक व आर्थिक आमिष दाखवण्यात आले. प्रश्न 2: आरोपी कोण आहेत?
Ans: पुण्यातील दोन भारतीय आरोपी आणि मलावीचा एक विदेशी नागरिक.
Ans: पुढे काय कारवाई होणार?






