पहिला घटना
नाशिक शहरातील सिडकोतील आनंदनगर परिसरात राहणारी एक तरुणी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर निघाली. मात्र ती परत आलीच . नाही. तिच्या पालकांनी तिला सर्वत्र शोधले मात्र ती सापडलीच नाही. कोणी अज्ञात व्यक्तीने तिला कश्याचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा सांशय तिच्या आई वडिलांचा संशय व्यक्त केला आहे. अंबड पोलिसांनी या प्रारकानी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेत आहे.
दुसरी घटना
नाशिकरोड येथील जेतवननगर भागात राहणारा 9 वर्षांचा मुलगा घरातून अचानक बेपत्ता झाला आहे. तो कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. आणि घरी परतला नाही. म्हणून कुटुंबीयांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस या मुलाचा शोध घेत आहे.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आणि आपल्या पाल्यांची माहिती अनोळखी व्यक्तींना न देण्याचे पालकांना केले आहे. दोन्ही पोलीस ठाण्यातील पथके बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.
लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतून लहान मुल पळवणाऱ्यांची टोळी सक्रिय आहे आणि खूप गंभीर बाब आहे. अशी एक पत्र राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होत. नवी मुंबई परिसरात लहान मुल पळवल्याच्या घटना घडल्या होत्या. हे प्रकरण ताज असतानाच आता नाशिक मध्ये पण तीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने नाशिक जिल्हा आणि शहरात मात्र खळबळ माजली आहे. नाशिक शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत.
Ans: सिडको (आनंदनगर) आणि नाशिकरोड (जेतवननगर) परिसरात.
Ans: एक कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी आणि 9 वर्षांचा चिमुकला
Ans: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?






