
एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीचा खून; दारू पिण्यासाठी बोलावले अन्...
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुजूरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिपक वाकचौरे, उपनिरीक्षक अमित सिदपाटील व त्यांच्या पथकाने केली.
गेल्या आठवड्यात (दि. १४ डिसेंबर) दीपक याचा मृतदेह माळशिरस येथील रामकाठी शेताच्या शिवारात आढळला होता. त्याच्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे दिसून आले होते. याबाबत दीपकचे मामा संतोष रोहीदास शेंडकर (वय ४६, रा. चांबळी, ता.पुरंदर) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व जेजुरी पोलिस तपास करत होते. तेव्हा तपासात मापारे याच्यावर पोलिसांना संशय आला होता. त्याचा शोध घेताना तो पळून जाण्याच्या तयारीत होता. तो यवत परिसरात लपून बसल्याची माहिती समजली. पथकाने मापारेला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत एक अल्पवयीन आरोपी असल्याचेही समोर आल्यानंतर त्यालाही ताब्यात घेतले. मापारेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुशांत मापारे याचे मृत दीपक जगताप यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. तिच्यासोबत लग्न करण्याची आरोपीची इच्छा होती. परंतु तिचे लग्न दीपक यांच्याबरोबर झाल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावतून त्याने दीपक यांना दारू पिण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. एका अल्पवयीन साथीराच्या मदतीने त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला. नंतर मृतदेह माळशिरस गावच्या रामकाठी शेताच्या शिवारात फेकून दिला.