Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर…’; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

कारागृहात शिस्तीचे आदेश देणे एका अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. दोन दिवसांनी ‘मोका’तील सहा कैदी थेट त्यांच्या केबिनमध्ये घुसले अन् सुरू झाला मारहाणीचा थरार!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 17, 2026 | 12:02 PM
Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर...'; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

Kolhapur Crime: ‘शांत राहा, नाहीतर...'; कळंबा कारागृहात वरिष्ठ अधिकाऱ्याला कैद्यांकडून मारहाण

Follow Us
Follow Us:
  • कळंबा जेलमध्ये कैद्यांचा हल्ला
  • अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसले
  • सहा ‘मोका’ कैद्यांवर गुन्हा
कोल्हापूर : ‘तू लई नियमानं वागतोस, शांत राहा, नाहीतर बाहेर गेल्यावर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी देत ‘मोका’तील सहा कैद्यांनी कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रकाश फुन्नू चव्हाण (वय ५०, रा. साळोखेनगर) यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी सकाळी कारागृहातील मंडल अधिकारी कार्यालयात घुसून कैद्यांनी चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका कैद्याने दगडाने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो चुकवताना दगड डाव्या हाताच्या पंज्यावर लागल्याने चव्हाण जखमी झाले. याप्रकरणी अल्ताफ शरीफ, भारत राजू शेट्टी, विनायक संभाजी चौगुले, आशुतोष संतोष वर्तले, आदम मोहम्मद मुजावर आणि शाहिद मन्सूर यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Weather News: महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम; १७ सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे हवामान?

दंगा करणाऱ्या कैद्यांना सुनावले

प्रकाश चव्हाण हे कळंबा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १४ सप्टेंबर रोजी कारागृहातील सर्कल क्रमांक एकमधील बॅरेक क्रमांक तीन आणि चारमध्ये काही कैदी गोंधळ घालत होते. आरडाओरडा सुरू झाल्याने चव्हाण घटनास्थळी गेले. कारागृहातील शिस्त मोडू नका आणि दंगा करू नका, अशा सूचना त्यांनी कैद्यांना दिल्या. या घटनेनंतर कैद्यांमध्ये चव्हाण यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

केबिनमध्ये घुसून मारहाण

बुधवारी सकाळी सहा कैदी अचानक मंडल अधिकारी कार्यालयात घुसले. त्यांनी चव्हाण यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कैदी अल्ताफ शरीफ याने दगडाने चव्हाण यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला चुकवण्यासाठी चव्हाण यांनी डावा हात वर केला. त्यामुळे दगड त्यांच्या हाताला लागला आणि ते जखमी झाले. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. कारागृहातील अधिकाऱ्यावरच कैद्यांनी हल्ला केल्याने सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा: दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

सहा कैद्यांचे स्थलांतर होणार

या घटनेनंतर संबंधित सहा कैद्यांना कळंबा कारागृहातून अन्य कारागृहात हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कारागृह प्रशासनाने त्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. अल्ताफ शरीफ, भारत शेट्टी, विनायक चौगुले, आशुतोष वर्तले, आदम मुजावर आणि शाहिद मन्सूर यांना अमरावती, नागपूर किंवा येरवडा कारागृहात हलवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. दरम्यान, हल्ल्यामागील नेमकी कारणे, कैद्यांमध्ये झालेला वाद आणि कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेबाबत पोलिस तसेच कारागृह प्रशासनाकडून पुढील तपास केला जात आहे.

Web Title: Kalamba jail kolhapur moka prisoners attack prison officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Kolhapur Crime
  • Kolhapur District

संबंधित बातम्या

Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी
1

Sangali Crime: सांगली हादरवणाऱ्या आटपाडी हत्या प्रकरणाचा निकाल; अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी ७० वर्षीय आरोपीला फाशी

Crime News: लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे  लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण
2

Crime News: लग्नाचे आश्वासन देत तरुणीवर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.