
crime (फोटो सौजन्य: social media)
कल्याण: कल्याण शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी भाषा येत नाही म्हणून कल्याण पूर्वेकडील एका खानावळीत नशेखोर तरुणांच्या टोळक्याने भयानक तोडफोड केली. एवढेच नाही तर तिथे कामकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली. नेमकं काय घडलं?
काय घडलं नेमकं?
कल्याणच्या पूर्वेकडील चक्कानाका परिसरात रिद्धी खाणावळ आहे. मराठी व्यावसायिक संदीप आढाव यांनी सहा महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरु केला. खानावळीत काही कर्मचारी नेपाळी वंशाचे असून ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र एकेदिवशी ४ तरुण नशेत खानावळीत आले. त्यापैकी एकाने वडापाव घेतला आणि पैश्यांवरून किरकोळ वाद झाला. खानावळीतील कर्मचारी हे मराठी शिकत असल्याने हिंदीमध्ये बोलत होते. त्या तरुणांपैकी एकाने कर्मचाऱ्याला ‘तुला मराठी का येत नाही?’ असे विचारले आहे. कर्मचाऱ्याने, ‘मी काही महिन्यांपूर्वीच नेपाळहून आलो आहे आणि मराठी शिकत आहे, असे उत्तर दिले आहे. हे ऐकून संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या अन्य ३ मित्रांना बोलावून घेतले.
या तरुणांनी मिळून खाणावळीची भयानक तोडफोड केली. तसेच कर्मचारी कुमार थापा आणि मदन या दोघांना बेदम मारहाण केली. मारहाण करून आणि खाणावळीचे नुकसान करून हे तरुण तेथून पळून गेले.
व्यावसायिकाचा संताप
खाणावळ चालक संदीप आढाव यांनी घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले, “आम्ही स्वतः मराठी आहोत. कसेबसे पैसे जमवून 6 महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला आहे. मराठी माणूस व्यवसाय करतोय, त्याला जगू द्या. आमचे कर्मचारी नेपाळी आहेत, पण ते मराठी शिकत आहेत. मारहाण करणारे हे तरुण नेहमीच परिसरात गोंधळ घालतात आणि नागरिकांना त्रास देतात. या नशेखोर तरुणांना पोलिसांनी कठोर धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कोणासोबत असे कृत्य करण्याची त्यांची हिंमत होणार नाही. या घटनेत आमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोण देणार? इतकी मोठी तोडफोड होऊनही घटनेला 24 तास उलटून गेले तरी कोणालाही अटक झालेली नाही.पोलिसांनी या चौघांच्या विरोधात ठोस कारवाई करावी. असे म्हणत व्यावसायिकाने संताप व्यक्त केलं.
या प्रकरणी, ४ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेला एवढा वेळ उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
Madhyapradesh: प्रसिद्ध मॉडेल ‘डायमंड गर्ल’चा सापडला मृतदेह, ‘लव्ह जिहादचा’ संशय, भोपाळ येथील घटना
Ans: कल्याण
Ans: चार
Ans: होय