Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरलेली दुचाकी घेऊन फिरणारा जेरबंद; कराड पोलिसांची मोठी कारवाई

सांगली जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी घेऊन फिरणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2025 | 01:27 PM
चोरीची दुचाकी घेऊन फिरणारा जेरबंद; कराड पोलिसांची मोठी कारवाई

चोरीची दुचाकी घेऊन फिरणारा जेरबंद; कराड पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

कराड : सांगली जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी घेऊन फिरणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून दुचाकी हस्तगत केली आहे. कराड शहर वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. निरंजन सोमनाथ साळुंखे (वय २२, मूळ रा. मासाळ टेक, म्हसवड, ता. माण (सध्या रा. खोडशी, ता. कराड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कराड शहर वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संतोष जगदाळे व कर्मचारी ओंकार शिंदे बुधवारी दुपारी बसस्थानक परिसरात कर्तव्य बजावत असताना एक दुचाकी त्यांनी अडवली. संबंधित दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे त्यांनी चालक निरंजन साळुंखे याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेतली. चालक निरंजन साळुंखे यालाही ताब्यात घेण्यात आले.

पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुचाकीच्या चेसी व इंजिन क्रमांकावरून परिवहन कार्यालयाकडून माहिती घेतली असता संबंधित दुचाकी भिलवडी स्टेशन येथील संतोष गाडे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असता ती दुचाकी मे २०२४ मध्ये चोरीस गेली असून, भिलवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितास दुचाकीसह भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 84 लाखांचे अमली पदार्थ जप्त

कारची काच फोडून चोरी

राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

Web Title: Karad traffic police has arrested the bike thief and taken action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
1

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
2

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
3

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
4

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.