Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Crime News : कर्जतमध्ये वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती ? स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला

कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 02, 2025 | 04:32 PM
Karjat Crime News : कर्जतमध्ये वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती ? स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे.

१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे नेहमीप्रमाणे चार फाटा येथील ठाकरे उपहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते. परतताना, कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले. वाटले की, कोणी पत्ता विचारतोय, म्हणून ते थांबले. मात्र काही कळायच्या आतच चार-पाच अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.त्यावेळी हल्लेखोरांनी हातात फायटर, लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली. मित्राने धाडसाने मधे पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले. काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी राखाडी रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले.जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून पायाला काही फक्चर आहे काय? हे तपासणी अंती निश्चित होणार आहे.

या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला.कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह ॲड. कैलास मोरे (कायदेशीर सल्लागार),तसेच रमाकांत जाधव, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, सतीश देशपांडे, माजी नगरसेवक ॲड. संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांची भेट घेतली.या भेटीत त्यांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला व पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात भा. द. वी. कलम ११८(१), ११५ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरन नवले हे करत असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा, हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, आणि प्रकरण गंभीरतेने घेण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांकडून केली जात आहे.

Web Title: Karjat crime news is crime increasing in karjat fatal attack on local journalist anger expressed among citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • crime news
  • Karjat
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन
1

Pune News: “२४ तास प्रभागातील नागरिकांच्या…”, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिले नागिरकांना आश्वासन

Ahilyanagar News: माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला, सात जणांविरोधात गुन्हा दाखल
2

Ahilyanagar News: माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी
3

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात
4

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.