Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : आदिवासींची फसवणूक करून जमिनीचे हस्तांतरण ; शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वस्ती करून आहे. या आदिवासी समाजाच्या जमिनीचे आदिवासी व्यक्तीला हस्तांतरण होत नाही. मात्र कर्जत तालुक्यात आदिवासी लोकांची जमीन बिगर आदिवासी लोकांना विकल्या जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 12, 2026 | 01:28 PM
Karjat News : आदिवासींची फसवणूक करून जमिनीचे हस्तांतरण ; शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन
Follow Us
Close
Follow Us:
  • आदिवासींची फसवणूक करून जमिनीचे हस्तांतरण
  • शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन
  • नेमकं प्रकरण काय ?
कर्जत / संतोष पेरणे : कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वस्ती करून आहे. या आदिवासी समाजाच्या जमिनीचे आदिवासी व्यक्तीला हस्तांतरण होत नाही. मात्र कर्जत तालुक्यात आदिवासी लोकांची जमीन बिगर आदिवासी लोकांना विकल्या जात आहे. याबद्दल आदिवासी शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदार यांची भेट घेऊन अशा जमिनी आदिवासी शेतकऱ्यांना पुन्हा परत करण्याची मागणी या आदिवासी लोकांनी केली.

कर्जत तालुका हा आदिवासी भाग म्हणून गणला जातो आणि आदिवासींची फसवणूक करून जमिनी हस्तांतरित करण्याचा प्रकार सर्रास चालू आहे. त्यातच मौजे अंतराट तर्फे वरेडी येथील सर्वे नंबर 30/4 अ क्षेत्र एक हेक्टर 95 गुंठे जमीन आनंद नरहर सुगवेकर यांच्या नावे होती. सन 5 /6 /1968 रोजी गोपाल रामा पारधी व इतर यांच्या नावे आहे.आदिवासी लोक खातेदार असून त्या त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कुळ म्हणून नोंद आहे. त्यात इतर हक्कात कुळाचे हक्क प्राप्त होऊन फेरफार क्रमांक 766 वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 36 ब व 36 अ अन्वये बिगर आदिवासी खातेदारांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन हस्तांतरणास बंदी असा शेरा ठेवण्यात आला आहे. तरीसुद्धा ही आदिवासी खातेदारांची जमीन तहसीलदार कर्जत यांच्या आदेशानुसार आदिवासी कुल खातेदार गोपाल रामा पारधी व इतर यांच्या नावे वीस गुंठे ठेवून उर्वरित एक हेक्टर 75 गुंठे क्षेत्र बिगर आदिवासी सावकार आनंद नरहर सुगवेकर यांच्या नावे करण्यात आली आहे.

बिगर आदिवासी खातेदारांना जमीन हस्तांतरणास बंदी असताना प्रथमदर्शनी आदिवासी खातेदारांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेतल्याचं समोर आलं. त्या आदिवासी खातेदारांना खोटे सांगून तहसीलदार कार्यालयात हजर न करता परस्पर फार्म हाऊसवर सह्या घेऊन एका खातेदाराच्या नावे शपथपत्र नोंद केली. त्यानंतर 18 गुंठे जमीन आदिवासी खातेदारांच्या नावे व उर्वरित जमीन स्वतःच्या नावे करण्याचे तहसील कार्यालय कर्जत यांच्याकडून आदेश घेऊन स्वतःच्या नावे करून घेतली असल्याचे निदर्शनात आले आहे.

मावळात अवैध धंद्यांचा उच्छाद! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळेच हातभट्टीचा व्यवसाय फोफावला?

पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रमेश कदम सामाजिक कार्यकर्त्या यांस कडून आदिवासी बांधवांच्या फसवणुकी बाबत दखल घेतली. मौजे अंञाड तर्फे वरेडी येथील आदिवासी खातेदार अनंत कान्हू खडवी, चांगी रामा पारधी, व गोपाल पारधी यांचे वारसदार धर्मी काशिनाथ निरगुडा यांनी उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश संकपाल, तसेच तहसीलदार अधिकारी कर्जत डॉ.धनंजय जाधव आणि पोलीस निरीक्षक ठाणे कर्जत उमेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनकेलं होतं. याप्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली होती.

जमीन आदिवासी खातेदार यांच्या नावे पुन्हा जैसे थे करण्यात यावी किंवा अनियमितता झाल्यामुळे सरकार जमा करण्यात यावी अशी आदिवासी खातेदार यांच्या वतीने पोलीस मित्र संघटनेची मागणी आहे. संबंधित महसूल विभागीय प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांना पंधरा दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा पंधरा दिवसानंतर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आदिवासी खातेदार तक्रारदार यांच्या सर्व कुटुंबासमवेत बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी जाहीर केले.

Karmala Crime News: बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

 

 

Web Title: Karjat news land transfer by defrauding tribals farmers submit a statement to the tehsildar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • crime news
  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव आणि अनुश्री मानेला चढलीय प्रेमाची झिंग, ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं
1

‘बिग बॉस मराठी’ फेम आयुष संजीव आणि अनुश्री मानेला चढलीय प्रेमाची झिंग, ‘तुझ्या पिरमाचा नाद खुळा’गाण्याने जिंकले मनं

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?
2

पिंपरीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, विरोधक उमेदवाराच्या घरात घुसून शिवीगाळ; नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस २’ विजेता शिव ठाकरेने केले लग्न? चेहरा लपवत शेअर केली पोस्ट; म्हणाला Finally…
3

‘बिग बॉस २’ विजेता शिव ठाकरेने केले लग्न? चेहरा लपवत शेअर केली पोस्ट; म्हणाला Finally…

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन
4

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.