Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: “लग्नाचं आमीष दाखवायचा आणि….”; ऑनलाईन वेडींग साईटवरुन फसवणूक करणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याशी लग्न करण्याचं आमीष दिलं जात असल्याचं उघड झालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2025 | 03:59 PM
Raigad News: "लग्नाचं आमीष दाखवायचा आणि...."; ऑनलाईन वेडींग साईटवरुन फसवणूक करणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Raigad News: "लग्नाचं आमीष दाखवायचा आणि...."; ऑनलाईन वेडींग साईटवरुन फसवणूक करणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : लग्नासाठी जोडीदार शोधण्यासाठी ऑनलाईन वेडींग साईट्सना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र हेच आता फसवणुकीचं कारण होत आहे. ऑनलाईन वेडींग साईटवरुन एका महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्याशी लग्न करण्याचं आमीष दिलं जात असल्याचं उघड झालं आहे. त्याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथून प्रतिक संजय देवरे याला ताब्यात घेतले.

कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासावर भर देऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. नाशिक येथे राहणारा 37 वर्षीय प्रतीक संजय देवरे याने ऑनलाईन पद्धतीने महिलांशी ओळख वाढवायचा. जीवनसाथी डॉट कॉम या वेडींग वेबसाईटवरून ओळख करून तिचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रतिक देवरे हा तरुण त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवायचा.

या तरुणाने आपल्या अमरावती येथे बिअर शॉप विकत घ्यायचे असल्याचे एका तरुणीला सांगितले. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून, संबंधित तरुणीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि एच डी एफ सी आदी बँकेतील खात्यातून एकूण सात लाख रुपये फोन पे आणि जी पे तसेच स्वतःच्या ऍक्सेस बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले. तसेच, रोख स्वरूपात 90 हजार रुपये घेत एकूण 7.90 लाख रुपये प्रतिक देवरे या देण्यात आले होते.मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी 6 फेब्रुवारी 2025 रोजी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 32/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318 (4) म्हणजेच 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्ती कुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील येरुनकर यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सर्व बाबींचा तांत्रिक तपास केला.त्यानंतर सापळा रचून पकडले असून शनीवारी कर्जत येथे आणले.या गुन्हेगाला पोलीसांनी  अटक केली आहे.

महाराष्ट्रभर महिलांची फसवणूक उघड

तपासादरम्यान उघडकीस झाले असून या आरोपीने महाराष्ट्रभर विविध महिलांना जीवनसाथी आणि इतर विवाह वेबसाईट्सद्वारे फसवले आहे. अशा वेबसाईट्सवर तो महिलांशी जवळीक साधत, विश्वास संपादन करत आणि आर्थिक फसवणूक करत होता. त्यामुळे याच्या विरोधात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.

महिला आणि तरुणींनी सतर्क राहावे पोलिसांचे आवाहन

सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून महिलांनी अनोळखी व्यक्तींशी जपून वागावे आणि विश्वास ठेवल्यापूर्वी योग्य तपासणी करावी, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे. लग्न जुळवण्यासाठी असलेल्या या ऑनलाईन वेडींग साईट्सच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

 

Web Title: Karjat police arrested a man who cheated women on jeevansathicom wedding website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • crime news
  • karjat news
  • raigad

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
2

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
3

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
4

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.