Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५…..; गुन्हेगारीचा आलेख उंचावला

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या वर्षभरात दलित अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने वर्षभरात तब्बल १०३ अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून ही बाब चिंताजनक आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 31, 2025 | 03:37 PM
संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५.....; गुन्हेगारीचा आलेख उंचावला (Photo Credit- X)

संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५.....; गुन्हेगारीचा आलेख उंचावला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • वर्षभरात गुन्हेगारीचा आलेख वाढलेलाच
  • पोलिस आयुक्तांनी दिली माहिती
  • दलित अत्याचारातही झाली वाढ
Crime News Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीगर शहरातील वाढते गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले असून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंगाच्या घटनेत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात दलित अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने वर्षभरात तब्बल १०३ अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून ही बाब चिंताजनक आहे. मात्र, खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल्याने पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा वार्षिक घटनांची माहिती

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गेल्या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा वार्षिक घटनांची माहिती पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी मंगळवारी आयुक्तालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नकार नवले, सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर आदींची उपस्थिती होती.

खुनाच्या प्रयत्नात झपाट्याने वाढ

प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या घटना झापाट्याने वाढल्या आहेत. गतवर्षी शहरात एकूण ११७ जणांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. यावर्षी तब्बल २५ गुन्हे वाढले असून हा आकडा १३४ वर पोहचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस खुनी हल्ला करणाऱ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते.

२८ खुनाच्या घटना उघडकीस

शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २८ खूनाच्या घटना समोर आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या १५ ने घटली असून त्यात सर्व २८ गुन्ह्यातील आरोपी उघड झाले आहेत.

हे देखील वाचा: Crime News: रेल्वे स्टेशन परिसरात ‘MD’ विकणाऱ्या सराईताला बेड्या; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बलात्कार सह विनभंगावे गुन्हे वाढले आहेत. गेल्या नऊ महिन्यात बलात्काराचे १५५ गुन्हे दाखल झाले असून गतवर्षापेक्षा ६ ने गुन्हे वाढले आहेत. तर विनयभंगाचे ३९९ गुन्हे दाखल असून त्यात गतवर्षाच्या तुलनेत १० ने गुन्हे वाढले आहेत.

दुचाकी चोरीची संख्या १ हजार ३४ वर

शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छांक मांडला असून गतवर्षीपेक्षा १७३ वाढून हा आकडा १ हजार ३४ वर पोहचला आहे. यापैकी २२० घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच शहरातील १९२ ठिकाणी जबरी चोऱ्या घडल्या आहेत. त्यापैकी १४७ गुन्हे उघडकीस आले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत जबरी चोरीच्या घटना १७ ने वाढली आहेत.

नायलॉन मांजा : २३ दिवसात १३ गुन्हे, २९ अटक

प्रतिबंधित नायलॉन मांजाचे डिसेंबरमधील २३ दिवसात १३ गुन्हे दाखल करून २३ लाख १५ हजार ५५० रुपये किमतीच्या १ हजार ६८३ भिंगरी-चक्री जप्त करण्यात आले. यातील २९ आरोपींना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह

दलित अत्याचाराचे गुन्ह्यात वाढ

पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षभरात दलित अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून तब्बल १०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ ने वाढ झाली असून अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत हे गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. हे वाढते गुन्हे चिंतेची बाब बनली असून मागसवर्गियांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहेत.

Web Title: The graph of crime in sambhaji nagar has only increased over the year according to information provided by the police commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.