6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर
कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई खरचं पक्की वैरीण असते का? कारण कर्नाटकातून एका सावत्र आईने सहा वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून ढकलले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली. आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की ती घटनेच्या वेळी झोपली होती.मात्र तिच्या शेजारच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमधून संपूर्ण प्रकरण उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेने स्वतः मुलीला छतावरून फेकून दिल्याचे दिसून आले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी महिलेला आता पोलिसांनी अटक केली आहे.
बिदरच्या आदर्श कॉलनीत ही घटना घडली आहे. मृत मुलीचे नाव शानवी असून, ती अवघ्या ७ वर्षांची होती. तिची सावत्र आई राधाने २७ ऑगस्ट रोजी शानवीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. शानवीची आई ६ वर्षांपूर्वी आजारपणामुळे मरण पावली. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर शानवीचे वडील सिद्धांत यांनी २०२३ मध्ये राधाशी दुसरे लग्न केले, त्यानंतर दोघांनाही जुळी मुले झाली.
बिदरमधील एका महिलेला ६ वर्षांच्या सान्वीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले नसते तर आरोपी महिला राधा कधीही पकडली गेली नसती. जिल्हा पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी बिदर शहरातील आदर्श कॉलनीमध्ये एक घटना घडली. तपासात असे दिसून आले की ६ वर्षांची मुलगी अचानक तिसऱ्या मजल्यावरून पडली आणि तिचा मृत्यू झाला. मुलीच्या सावत्र आईने कुटुंब आणि पोलिसांना सांगितले की ही घटना घडली तेव्हा ती तिच्या रुममध्ये झोपली होती आणि तिला याची माहिती नव्हती.
दरम्यान, पोलीस तपासानंतर मुलीच्या सावत्र आईचा हास्यविनोद जास्त काळ टिकला नाही. २७ ऑगस्ट रोजी घडलेली ही संपूर्ण घटना शेजारच्या घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेच्या दोन आठवड्यांनंतर एका शेजारी सीसीटीव्ही फुटेज पाहून थक्क झाला आणि त्याने सान्वीचे वडील सिद्धांत यांना माहिती दिली. त्यानंतर राधाविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी रविवारी आरोपी राधाला अटक केली.