आजकाल प्री-वेडिंग (karnataka doctor pre wedding shoot) शूट खूप लोकप्रिय झालं आहे. आपले फोटो सगळ्यात वेगळे आणि खास असावेत यासाठी कपल अनेक वेगवेगळे प्रयोग करतात. याबाबतील कर्नाटकातील डॅाक्टरने लढवलेली शक्कल खूपच भन्नाट होती मात्र हा फोटोशूट साठी केलेला अतिउत्साहीपणा आता त्यालाच नडला असून त्याला त्याची नोकरीही गमवावी लागली आहे. बघुया नेमकं काय केलं त्याने.
[read_also content=”७३ वर्षीय मिथुन चक्रवर्तींंच्या हेल्थ बाबत मोठी अपडेट, ब्रेन स्ट्रोक आल्याने सुरू होते उपचार; प्रकृती स्थिर! https://www.navarashtra.com/movies/mithun-chakraborty-health-update-given-by-his-son-mimoh-chakraborty-nrps-506054.html”]
कर्नाटकातील एका डॉक्टरने चित्रदुर्ग जिल्ह्यातील भरमसागर येथील सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या जोडीदारासोबत प्री-वेडिंग शूट केलं. मात्र असं करणं त्याच्या चांगलच अंगलट आलं आहे. यावेळी दाम्पत्याने खऱ्या वैद्यकीय उपकरणांसह बनावट शस्त्रक्रिया केल्याचा बनाव केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समाेर आल्यानंतर कर्नाटक सरकारने डॉ.अभिषेकला निलंबित केले.
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच. युझर्सने प्रतिक्रिया दिल्या आणि या जोडप्यावर टीका केली. एका युझरने लिहिले, “तुमच्या महान व्यवसायाबद्दल काही नैतिकता आणि आदर ठेवा.” दुसऱ्या युझरने टिप्पणी केली, “हे खेळाचे मैदान नाही. ओटी हे एक दैवी स्थान असले पाहिजे, जिथे महान डॉक्टर लोकांना मृत्यूपासून परत आणतात.
सोशल मीडियावर टीका होत असताना कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी एक विधान जारी केले. तसेच डॉ.अभिषेक यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. “चित्रदुर्गातील भरमसागर सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लग्नाआधी शूट करणाऱ्या डॉक्टरला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे,” असे मंत्री म्हणाले.






