कर्जत तालुक्यात प्रस्तावित विविध विकास प्रकल्पांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत आदिवासींच्या जमिनी हडपण्यासाठी दलाल सक्रिय असल्याचा दावा केला आहे. प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि आदिवासी बांधवांना योग्य मोबदला मिळेपर्यंत कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देणार नसल्याची भूमिका थोरवेंनी मांडली. नागरिकांनी आपली जमीन कोणालाही विकू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, थोरवेंच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागलं आहे.