crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे: पुण्यातील बुधवार पेठ परिसारात एका ज्वेलरी शॉपमधून दागिने आणि ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोळी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून एकाला अटक केली आहे. आता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लिखित जी (21, रा. कोलार, कर्नाटक) असे आहे. आरोपी हा मूळचा कर्नाटकाचा आहे. तो सराईत गुन्हेगार नसून तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.
मोठा निर्णय; आत्मदहनाचा प्रयत्न केल्यास वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैला मध्यरात्री पाऊण ते सव्वा वाजे दरम्यान, एका २० – २५ वर्षीय तरुणाने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीतून ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने 4 लाख 74 हजार रुपयांचं सोनं आणि ऐवज चोरी केला. चोरी करतांना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते.
आरोपीने आधी कर्नाटकातून पुण्यात येऊन रेकी केली आणि बुधवार पेठेतील एका सोन्याच्या दुकानात डाका टाकायचा आणि बाईक आणि कार घ्यायचा त्याच प्लॅन होता. मात्र हा प्लॅन फसला. त्याने ६ जुलैला चोरी केली परंतु चोरी करून बाहेर निघतांना त्याच्या हाताला बाथरूमची काच लागली त्यामुळे त्याला जखम झाली आणि त्या दुकानात सगळीकडे रक्त पडलं. दुकानाचे मालक जेव्हा सकाळी घरी आले तेव्हा त्यांना हे रक्त दिसलं. आणि दुकानाची पाहणी केल्यास सोन्याचे दागिने लंपास केले. त्यामुळे मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी २५० सीसीटीव्ही फुटेज पाहून अखेर त्याला कर्नाटकातील कोलार गावातून त्याला अटक केली.
आरोपीने तोंडाला मास्क लावून चोरी केल्यामुळे त्याचा मार्ग काढणं कठीण होत. पोलिसांनी त्याच्या बॅगच्या आधारे त्याचा तपास केला. चोरी करून हा कर्नाटकात पळून गेला होता. कर्नाटकात गेल्यावर त्याने सोनं विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते सोन एक गरमच असल्याचे त्याला समजले. पोलिसांच्या टीमने थेट कर्नाटक गाठत त्याची लोकेशन ट्रेस करत, स्थानिकांकडून माहिती घेत या चोराला पोलिसांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, नाशिक मधून एक चोरीची घटना समोर आली आहे. चक्क आमदाराच्य घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी दुसरं तिसरं कोणी नाही तर आमदाराच्या मोलकरीणबाई ने केली आहे. ही चोरी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्या जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या मोलकरीणचं नाव संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) असे आहे. हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.