Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी साडेपाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात सिया गोयलच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून केतनच्या लग्नाच्या कोट्यवधींच्या तयारीपर्यंत अनेक बाबींचा उल्लेख आहे. सियाला ८० लाखांचे दागिने आणि उदयपूरमधील लग्नासाठी २५ लाख देऊन रिसॉर्ट बुक केल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 29, 2026 | 04:59 PM
केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सिया गोयलच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहित

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सिया गोयलच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहित

Follow Us
Follow Us:
  • केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; जुन्या प्रेमप्रकरणाचाही तपास
  • सियाला ८० लाखांचे दागिने; ७-८ लाखांचे २८ ड्रेस दिल्याचा दावा
  • उदयपूरमधील लग्नासाठी २५ लाख देऊन रिसॉर्ट बुक केल्याचे आरोपपत्रात नमूद
 

पुणे : पुण्यासह देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात तब्बल साडेपाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात केतन अग्रवालच्या हत्येचा कट कसा रचण्यात आला, हत्या कशी करण्यात आली आणि संबंधित व्यक्तींच्या पार्श्वभूमीचा तपास कसा करण्यात आला, याची माहिती देण्यात आली आहे. तपासादरम्यान सिया गोयलच्या शाळेतील जुन्या प्रेमप्रकरणाचे धागेदोरेही पोलिसांनी तपासल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

हेही वाचा: Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

दहावीतील जुन्या प्रेमप्रकरणाचा तपासात उल्लेख

पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल दहावीत असताना तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. सियाचे नंतर चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्यानंतर त्या मुलाने तिच्याशी संबंध तोडल्याचे सांगण्यात आले. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान या माजी प्रियकराचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्याने सियासोबतच्या जुन्या संबंधांबाबत माहिती दिल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पहिल्या भेटीत लाखोंचे कपडे; साखरपुड्यात ८० लाखांचे दागिने

केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलाच्या लग्नाच्या तयारीबाबतही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील वेस्ट इन हॉटेलमध्ये गोयल आणि अग्रवाल कुटुंबीयांची भेट झाली. यावेळी केतन आणि सिया यांचा रोका विधी झाला. या वेळी सियाला २८ ड्रेस देण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील रिट्ज-कार्लटन हॉटेलमध्ये दोघांचा साखरपुडा झाला. यावेळी सियाला सुमारे ८० लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने दिल्याचे विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले.

हेही वाचा: Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

उदयपूरमध्ये लग्नासाठी रिसॉर्ट बुक

केतन हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या लग्नासाठी मोठी तयारी सुरू होती. लग्नासाठी चार ते पाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असल्याचेही विशाल अग्रवाल यांनी जबाबात सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे लग्नासाठी आलिशान रिसॉर्ट बुक करण्यात आले होते. या बुकिंगसाठी रिसॉर्ट मालकाला २५ लाख रुपये आगाऊ देण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. केतनच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी आर्थिक व्यवहार, कौटुंबिक संबंध, जुन्या प्रेमसंबंधांसह विविध बाबींचा तपास केला. या सर्व तपासातून समोर आलेल्या माहितीचा समावेश साडेपाच हजार पानी आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Web Title: Ketan agrawal murder case chargesheet siya goyal love affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Ketan Agarwal
  • Ketan Agarwal Murder Case
  • pune crime case
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
1

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास
2

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी
3

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
4

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.