Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Muder Case: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन? चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात राजस्थान कनेक्शन समोर आले आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयल लग्नानंतर राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचा दावा चेतनच्या मित्रांनी केला आहे. दरम्यान, केतनच्या मोबाईलमधील डेटा डिलीट झाला का, याचाही फॉरेन्सिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 10:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• चेतनच्या मित्रांच्या दाव्यानुसार, सिया आणि चेतन राजस्थानमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते.
• केतनचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून डेटा डिलीट झाल्याचा संशय आहे.
• पुणे पोलिसांकडून हत्या प्रकरणाचा तांत्रिक आणि डिजिटल तपास वेगाने सुरू आहे.

पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे नियोजनबद्ध कट असल्याचा पोलिसांचा संशय असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबतही नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, चेतनच्या जोधपूरमधील मित्रांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणातील राजस्थान कनेक्शन चर्चेत आले आहे.

चेतन हा मूळचा जोधपूरचा

मुख्य आरोपी चेतन चौधरी हा मूळचा जोधपूरजवळील पलासनी गावचा रहिवासी आहे. तो पुण्यात उच्च शिक्षणासाठी आला होता. चेतनचे वडील जोधपूरमध्ये एक किराणा दुकान चालवतात, तर या दुकानाच्या अगदी समोरच मुख्य आरोपी महिला सिया गोयलच्या वडिलांचे कार्यालय आहे. पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना चेतन क्रिकेट खेळायचा. याच दरम्यान त्याची ओळख सियाचा भाऊ साहिल याच्याशी झाली. साहिलच्या माध्यमातूनच चेतन आणि सिया एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

चेतनच्या मित्रांनी काय सांगितले

चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध इतके घट्ट होते की, ते एकमेकांसोबत उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायलाही गेले होते. जोधपूरमध्ये चेतनच्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिले देखील होते. चेतनने आपल्या मित्रांना विश्वासाने सांगितले होते की, “आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार आहोत.” इतकेच नव्हे तर, चेतन अनेकदा सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानच्या संस्कृतीशी संबंधित रील्स दाखवायचा. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूरमध्ये कायमचे सेटल होण्याचा या दोन्ही आरोपींचा विचार होता. “लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होण्यासाठी लागणाऱ्या रकमेची सोय सिया स्वतःच्या घरातून (कुटुंबाकडून) करेल,” असा दावा चेतनने आपल्या मित्रांजवळ केला होता.

सियाने केतनच्या फोनमधून डेटा डिलीट केला?

दरम्यान, केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात मोबाईल फोन महत्त्वाचा पुरावा ठरत असून, केतनला दरीत ढकलल्यानंतर त्याचा मोबाईल सियाकडे कसा आला, याचा तपास पोलीस करत आहेत. केतनचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, कुटुंबीय लोहगडावर पोहोचण्यापूर्वी मोबाईलमधील काही डेटा डिलीट करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर सियाने मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली असून, फॉरेन्सिक अहवालातून डेटा डिलीट झाला का? याबाबत उलगडा होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

💡

Frequently Asked Questions

  • Que: चेतन चौधरीच्या मित्रांनी कोणता दावा केला आहे?

    Ans: सिया आणि चेतन लग्नानंतर उदयपूर किंवा जोधपूरमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत होते, असा दावा मित्रांनी केला आहे.

  • Que: केतनच्या मोबाईलबाबत पोलिसांना काय संशय आहे?

    Ans: कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी मोबाईलमधील काही डेटा डिलीट करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

  • Que: या प्रकरणात सध्या पोलिसांचा भर कोणत्या तपासावर आहे?

    Ans: मोबाईलचा फॉरेन्सिक तपास, डिजिटल पुरावे आणि आरोपींच्या हालचालींचा तपास यावर पोलिसांचा भर आहे.

Web Title: Ketan agrawal murder case did chetan and siya plan to shift to rajasthan sensational revelation by chetans friends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
1

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
2

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
3

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
4

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.