Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. आरोपी सिया गोयलला तिच्या कोंढवा येथील घरी नेऊन घटनेच्या दिवशीचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. सिया आणि चेतन चौधरी यांच्या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2026 | 03:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया गोयलला कोंढवा येथील घरी नेऊन कपडे, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
  • लोहगडावर हत्येचे रिक्रिएशन केल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे.
  • सिया आणि चेतन चौधरी यांच्या कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू आहे.
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक गती घेत असून, आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात पोलिसांकडून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. लोहगडावर हत्येचे रिक्रिएशन केल्यानंतर पोलिसांनी सियाला कोंढवा येथील तिच्या राहत्या घरी नेऊन झडती घेतली. घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

पोलीस सियासोबत ‘लीलाकुंज’मध्ये दाखल

पुण्यातील कोंढवा परिसरातील ‘लीलाकुंज’ या निवासस्थानी पोलीस सियाला घेऊन पोहोचले. घटनेच्या दिवशी तिने वापरलेले कपडे जप्त करून त्यांचा पंचनामा करण्यात आला. पोलीस सुमारे एक तास सियाच्या घरी थांबले. पोलिसांच्या तपासानुसार, याच ठिकाणी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या कटाची कथित तालीम केली होती. यावेळी सियाचे कुटुंबीयही घरी उपस्थित होते.

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचाही तपास

या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असली, तरी त्यांच्या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचाही तपास लोणावळा पोलीस करत आहेत. रिमांडदरम्यान पोलिसांनी न्यायालयात या अँगलने दोन्ही आरोपींकडे चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या कटामागे आणखी कोणी होते का, याबाबत उत्सुकता वाढली असून पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे. मात्र, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत नाव किंवा माहिती जाहीर केलेली नाही.

 

#WATCH | Lonavala | Ketan Agarwal murder case | Police brings the accused, Siya, to her residence as the investigation into the murder of Ketan Agarwal continues pic.twitter.com/qt9OItx5vU — ANI (@ANI) July 2, 2026

 

पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर

आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण आणि आई पूजा गोयल यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सिया आणि केतन यांचे लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दाम्पत्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. बालीला प्री-वेडिंग शूटसाठी जाताना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाकडूनही पोलिसांनी महत्त्वाची माहिती घेतली आहे.

दरम्यान, घटनेनंतर सियाच्या घरात पंचनामा करून तिचे कपडे, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. ३ जुलै रोजी सियाची पोलीस कोठडी संपत असल्याने तपासाच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे, आरोपींची चौकशी आणि तपासातील निष्कर्ष यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असून, या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ketan Agrawal Case : केतन हत्येप्रकरणात तपासात पोलिसांना येते ‘ही’ मोठी अडचण; खटला भक्कमपणे सिद्ध करण्यासाठी…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून काय जप्त केले?

    Ans: घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडे, मोबाईल आणि इतर महत्त्वाच्या वस्तू जप्त करून पंचनामा करण्यात आला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांचा संशय कोणत्या मुद्द्यावर आहे?

    Ans: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग होता का, याचा पोलीस तपास करत आहेत.

  • Que: सियाच्या पोलीस कोठडीचे महत्त्व काय?

    Ans: ३ जुलै रोजी कोठडी संपत असल्याने त्याआधी पुरावे गोळा करणे आणि चौकशी पूर्ण करण्यावर पोलिसांचा भर आहे.

Web Title: Ketan agrawal murder case evidence seized from siyas home on whom exactly does police suspicion now fall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.