Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! पोलीस कोठडी वाढवण्यास कोर्टाचा नकार; न्यायालयीन कोठडीत रवानगी

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 09:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली.
  • मोबाईलमधील डिलीट डेटा, सांकेतिक संदेश आणि पुराव्यांच्या पडताळणीसाठी पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी केली होती.
  • न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी वडगाव मावळ न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मोबाईलमधील डिलीट डेटा, सांकेतिक संदेश आणि संभाव्य सहआरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

कोर्टात काय घडलं नेमकं?

सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, गेल्या पाच दिवसांत तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींचे कपडे, मोबाईलमधील डिलीट डेटा आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या पुराव्यांची समोरासमोर पडताळणी करण्यासाठी आणखी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पोलीस कोठडी देणे गरजेचे असल्याचा आग्रह त्यांनी धरला.

Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीला पुन्हा तुरुंगात पाठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; 10 जुलैला पुढील सुनावणी

बचाव पक्षाने काय मांडलं?

सिया गोयलचे वकील विपुल दूशिंग यांनी न्यायालयात सांगितले की, सिया तपासात पूर्ण सहकार्य करत आहे. पोलिसांनी ज्या मोबाईलचा उल्लेख केला, तो आधीच जप्त करण्यात आला आहे. केवळ मोबाईलमधील संदेशांचा अर्थ लावण्यासाठी किंवा सांकेतिक चिन्हांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी मागणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे पोलीस कोठडी नाकारावी, अशी मागणी बचाव पक्षाने केली. तर दुसऱ्या बाजूने केतन अग्रवाल यांच्या वकिलांनीही पोलिसांकडे केवळ शक्यता आणि संशय असल्याचे सांगितले. ठोस कारणांशिवाय आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

नार्को टेस्टबाबत न्यायालयाची टिप्पणी, नेमकं काय म्हणाले?

सुनावणीदरम्यान नार्को टेस्टचाही मुद्दा उपस्थित झाला. यावेळी न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, नार्को विश्लेषण चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असते. त्यांच्या संमतीशिवाय अशा चाचणीला परवानगी देता येणार नाही. त्यावर सरकारी वकिलांनी सध्या नार्को टेस्टची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले.

पोलीस कोठडी फेटाळली

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Crime : फरार गुंडाच्या बेकायदा हॉटेलवर चालवला बुलढोझर; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत काय निर्णय दिला?

    Ans: न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळून लावत दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

  • Que: पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कोठडी का मागितली होती?

    Ans: मोबाईलमधील डिलीट डेटा, सांकेतिक संदेश, निकनेमची पडताळणी आणि संभाव्य सहआरोपींचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी आणखी तीन दिवसांची कोठडी मागितली होती.

  • Que: नार्को टेस्टबाबत न्यायालयाने काय स्पष्ट केले?

    Ans: न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींच्या संमतीशिवाय नार्को विश्लेषण चाचणी करता येत नाही.

Web Title: Ketan agrawal murder case major relief for siya and chetan court refuses to extend police custody remanded to judicial custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
1

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
2

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
3

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

Crime News : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील
4

Crime News : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.