Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

केतन अग्रवालच्या हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे संशयाचे धागे आणखी गडद होत आहेत. हत्येआधी सिया आणि चेतनचे दोन हॉटेल मुक्काम, डिलीट केलेल्या चॅट्सचा शोध आणि सियाच्या गुगल हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह संशयास्पद कीवर्ड सापडल्याने पोलिसांच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 02, 2026 | 11:01 AM
हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

Follow Us
Follow Us:
  • हत्येआधी सिया-चेतनचा हॉटेल मुक्काम
  • गुगल हिस्ट्रीत लोहगड, ट्रेकिंग सर्च
  • डिलीट चॅट्सबाबत मित्राकडे चौकशी
 

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात एकापाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात चेतनच्या पूर्वीच्या एका तरुणीसोबतच्या कथित गैरवर्तनापासून ते सिया-चेतनच्या हॉटेलमधील मुक्कामापर्यंत अनेक बाबी पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

चेतनवर तरुणीने केला बळजबरीचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, केतनच्या हत्येच्या सुमारे वर्षभर आधी चेतन चौधरी एका तरुणीच्या संपर्कात होता. त्या वेळी पुण्यातील एका विद्यापीठात शिकत असलेल्या या तरुणीने चेतनने तिच्याशी बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ९ मे २०२५ रोजी ती तरुणी, तिची मैत्रीण, मैत्रिणीचा प्रियकर आणि चेतन चौघे एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर चौघे एका लॉजमध्ये थांबले. यावेळी चेतन आणि संबंधित तरुणी वेगळ्या खोलीत गेले होते. दुसऱ्या दिवशी तरुणीने घडलेला प्रकार मैत्रिणीला सांगितल्याचे तिच्या जबाबात नमूद असल्याची माहिती आहे. चेतनने असे कृत्य दोन-तीन वेळा केल्याचेही मैत्रिणीने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

हत्येपूर्वी सिया-चेतनचा हॉटेल मुक्काम

केतनच्या हत्येपूर्वी सिया आणि चेतन पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिल्याचे तपासात समोर आले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये चेतनने एनआयबीएम रोडवरील एका हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली होती. त्या वेळी दोघे खोली क्रमांक ३०४ मध्ये राहिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये दोघे गुलटेकडी परिसरातील आणखी एका हॉटेलमध्ये थांबले होते. या दोन्ही मुक्कामांदरम्यान सादर करण्यात आलेल्या ओळखपत्रांच्या प्रती पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

डिलीट केलेल्या चॅट्सचा शोध घेण्याचा प्रयत्न?

चेतनच्या एका मित्राचाही पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. या मित्राच्या म्हणण्यानुसार, २२ जून रोजी चेतनने त्याच्याशी संपर्क साधला होता. लोणावळ्यातील एका घटनेचा संदर्भ देत त्याने पोलिस डिलीट केलेले व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम चॅट्स पुन्हा मिळवू शकतात का, अशी विचारणा केल्याचे सांगण्यात आले. तसेच क्राइम ब्रँच किंवा मोबाइल कंपनीत अशी ओळख आहे का, ज्याच्या माध्यमातून मदत मिळू शकेल, अशीही विचारणा चेतनने केल्याचा दावा त्याच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. मात्र, संबंधित मित्राने अशी कोणतीही ओळख नसल्याचे सांगितले.

सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीत काय?

तपासादरम्यान सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीचीही पोलिसांनी तपासणी केल्याची माहिती आहे. त्यामध्ये कथित हत्येच्या नियोजनाशी संबंधित असल्याचे पोलिसांकडून पाहिले जात असलेले विविध कीवर्ड आढळल्याचे वृत्त आहे. ‘सोनम केस’, ‘डेथ कॅप मशरूम इंडिया’ यांसह आयफोनमधील कॉल हिस्ट्री डिलीट करण्याची पद्धत, लोहगड आणि ट्रेकिंगदरम्यान होणाऱ्या अपघातांशी संबंधित माहिती शोधल्याचे समोर आल्याचे सांगितले जात आहे. या सर्चचा केतनच्या मृत्यूशी नेमका संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. केतन अग्रवाल यांच्या मृत्यूला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता का, सिया आणि चेतनने यापूर्वीपासूनच काही तयारी केली होती का आणि डिजिटल पुराव्यांमधून आणखी कोणती माहिती समोर येते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Ketan agrawal murder case siya goyal chetan chaudhary google history hotel stay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Ketan Agarwal
  • pune crime case
  • Pune live updates News
  • Siya Goyal

संबंधित बातम्या

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…
1

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड
2

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली
3

चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…
4

कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.