'तिला' दुचाकीवरून गावाबाहेर घेऊन गेले अन्..., सहा मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार (फोटो सौजन्य-X)
Bihar Crime News in Marathi : एकिकडे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असताना लहान मुली विकृतांच्या वासनेच्या बळी पडत आहेत. अशीच एक घटना बिहारमधून समोर आली आहे. बिहारमधील खगारिया येथे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. ही निष्पाप मुलगी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या गुन्ह्याची बळी ठरली. रात्री जेव्हा भयानह शांतता असते तेव्हा काहीजण या अल्पवयीन मुलींला काही बहाण्याने घराबाहेर पडण्यास भाग पडतात. या सहा जणांपैकी एक ओळखीचा मित्र असतो. आणि त्याच मित्राच्या विश्वासावर ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडते. पण या मुलीला माहितं नसतं,तिजा हाच विश्वास तिच्यासाठी घातक ठरू शकतो. कारण तिच्या मित्राने या अल्पवयीन मुलीला त्याच्या दुचाकीवर बसवले आणि गावातील धरणावर घेऊन गेला.
धरणाजवळ पोहचल्यानंतर जे घडलं त्यानंतर या अल्पवयीन मुलींचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं. कारण धरणाजवळ पोहचल्यानंतर पीडितेच्या मित्राने तिला गोळ्यांनी भरलेले एक ड्रग्ज दिले. तरुणीला याची जाणीव नव्हती. हळूहळू तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. तेवढ्यात आणखी पाच तरुण आले. शेवटी सहा मुलांनी या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा जघन्य गुन्हा केला. त्यांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर सर्व गुन्हेगार पळून गेले आणि तिला अर्धमेल्या अवस्थेत धरणावर सोडून गेले.
ती रात्रभर बेशुद्ध पडली. सकाळी उठल्यावर तिला वेदना आणि भीतीने ग्रासले. कशी तरी ती घरी पोहोचली आणि तिच्या कुटुंबाला तिच्या अत्याचाराबद्दल सांगितले. तिची अवस्था पाहून कुटुंब हादरले. कुटुंबाने ताबडतोब परबत्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्हाची पोलिसांनी नोंद घेतली असून 6 जणांवर गुन्हा दाखल केला, परंतु सर्व आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की कुटुंबाच्या तक्रारीवरून कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके छापे टाकत आहेत. केवळ १४ वर्षांची पीडिता आता धोक्याबाहेर आहे, परंतु हा डाग तिच्या हृदयावर आणि मनावर आयुष्यभर राहील. या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे आणि लोक त्यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत, परंतु या अल्पवयीन मुलीचा काय दोष होता? असा सवाल उपस्थित होत आहे.