Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित

उल्हासनगर कैलास कॉलनीतील फायरिंग प्रकरणात दोन जणांचा मृत्यू आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासातून आरोपी आणि पोलिसातील कथित कनेक्शन उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 10, 2026 | 10:27 AM
कैलास कॉलनी फायरिंग तपासात 'खाकी कनेक्शन'; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित

कैलास कॉलनी फायरिंग तपासात 'खाकी कनेक्शन'; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित

Follow Us
Follow Us:
  • पोलिसांनाच हादरवणारे ‘खाकी कनेक्शन’ समोर
  • फायरिंग प्रकरणात दोन जणांचा मृत्यू
  • पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची कारवाई
उल्हासनगर / साई सावंत : उल्हासनगरच्या कैलास कॉलनीतील फायरिंग आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासात आरोपींचे धागेदोरे शोधताना पोलिसांनाच हादरवणारे ‘खाकी कनेक्शन’ समोर आले आहे. आरोपीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती आरोपींपर्यंत पोहोचवल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई सुभाष घाडगे यांना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी निलंबित केले आहे.

उल्हासनगर कैलास कॉलनीतील फायरिंग प्रकरणात दोन जणांचा मृत्यू आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासातून आरोपी आणि पोलिसातील कथित कनेक्शन उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हिललाईन पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी दीपक ठाकुरच्या परिसरातील ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर जप्त करून व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची पाहणी केली. त्यामध्ये तत्कालीन हिललाईन आणि सध्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई सुभाष वामन घाडगे हे मध्यरात्री दीपक ठाकुरच्या ‘के. सी. ग्रुप’ कार्यालयात जाऊन आरोपी दीपक ठाकुर, सुभाष कोळी आणि त्यांच्या साथीदारांना भेटत असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच सुभाष घाडगे यांनी दाखल गुन्हे, अटक आरोपींची चौकशी, आरोपीना चौकशी दरम्यान होणारी मारहाण तसेच मध्यवर्ती, हिललाईन आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांच्या कामकाजासह गोपनीय व वैयक्तिक माहिती आरोपींना पुरवल्याचा गंभीर ठपकाही ठेवण्यात आला आहे. या माहितीचा वापर पोलिसांविरोधात स्थानिक युट्युब चॅनलवर बातम्या प्रसारित करून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी होत असल्याचे आदेशात नमूद आहे.

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची कारवाई

या गैरवर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत उल्हासनगर परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सुभाष घाडगे यांना सेवेतून निलंबित केले आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरले ! ‘याला जिवंत सोडू नका’ मध्यरात्री पोलिसाला घेरले, तरुणीचा पोलीस अंमलदारावर चाकूने हल्ला अन्…

Web Title: Khaki connection in kailas colony firing probe police constable subhash ghadge suspended nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • crime news
  • Firing News
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
2

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
3

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
4

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.